SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
करवीर तहसिल कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनथकीत भाडे न भरलेल्या सहा गाळ्यांना महापालिकेचा सीलकृषी व कृषी संलग्न पदवी प्रवेशासाठी डी. वाय. पाटील कृषी संकुलात निशुल्क मार्गदर्शनकेआयटीची जागतिक झेप;वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाशी सामंजस्य करारकोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी: केंद्रीय आरोग्य योजनेत दोन खासगी रुग्णालयांचा समावेश; खासदार धनंजय महाडिकांच्या प्रयत्नांना यश"आयुष क्लिनिक" प्रथम वर्धापन दिन उत्साहातकोल्हापूरचा 'प्रणित' चमकला! राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवला नववा क्रमांकडी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ५० जागांची वाढआर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत शनिवारी मार्गदर्शनपर सेमिनारआंतरराष्ट्रीय न्याय दिन: न्यायाच्या दिशेने जागतिक वाटचाल

जाहिरात

 

आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत शनिवारी मार्गदर्शनपर सेमिनार

schedule17 Jul 26 person by visibility 196 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरवतीने (स्वायत्त संस्था)आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रिया 2026-27 बाबत मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार  दि. 18जुलै रोजी सकाळी 10 वाजता डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथे हा सेमिनार होणार आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

गेल्या 42 वर्षांपासून गुणवत्तापूर्ण आर्किटेक्चर शिक्षणासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ओळखले जाते. 2020 मध्ये महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला. शनिवारी होणाऱ्या या सेमिनारमध्ये आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेशी संबंधित सर्व विषयांवर डॉ. गुप्ता सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. 

यामध्ये आर्किटेक्चर शिक्षणाची सद्यस्थिती, आर्किटेक्चरमधील भविष्यातील ट्रेंड, आर्किटेक्चर पदवीनंतरच्या करिअरच्या संधी, आरक्षण, नाटा 2026च्या निकालाचे विश्लेषण आणि संभाव्य मेरीट लिस्ट नंबर, राज्यातील टॉप कॉलेजचा कट ऑफ, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक व आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन नोंदणी, कागदपत्र अपलोड करताना घ्यायची काळजी, स्कॉलरशिप,ऑप्शन फॉर्म भरणे, प्रवेश प्रक्रिया 2026-27 मधील महत्वाचे बदल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.    

यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले जाणार आहे. हा सेमिनार पूर्णपणे मोफत असून  आर्किटेक्चरमधील उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी-पालकांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, अ‍ॅडमिशन सेलचे प्रमुख प्रा. रविंद्र बेन्नी  व आर्किटेक्चर विभाग प्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes