SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
करवीर तहसिल कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनथकीत भाडे न भरलेल्या सहा गाळ्यांना महापालिकेचा सीलकृषी व कृषी संलग्न पदवी प्रवेशासाठी डी. वाय. पाटील कृषी संकुलात निशुल्क मार्गदर्शनकेआयटीची जागतिक झेप;वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाशी सामंजस्य करारकोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी: केंद्रीय आरोग्य योजनेत दोन खासगी रुग्णालयांचा समावेश; खासदार धनंजय महाडिकांच्या प्रयत्नांना यश"आयुष क्लिनिक" प्रथम वर्धापन दिन उत्साहातकोल्हापूरचा 'प्रणित' चमकला! राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवला नववा क्रमांकडी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ५० जागांची वाढआर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत शनिवारी मार्गदर्शनपर सेमिनारआंतरराष्ट्रीय न्याय दिन: न्यायाच्या दिशेने जागतिक वाटचाल

जाहिरात

 

केआयटीची जागतिक झेप;वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाशी सामंजस्य करार

schedule17 Jul 26 person by visibility 152 category

▪️संशोधन, मायक्रो-क्रेडेन्शियल्स, सेंटर ऑफ एक्सलन्स, विद्यार्थी देवाणघेवाण आणि ऑस्ट्रेलियात इंटर्नशिपची संधी 

कोल्हापूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) प्रभावीपणे राबविणाऱ्या केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाने जागतिक शिक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत ७७ व्या स्थानावर असलेल्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाशी (University of Western Australia) सामंजस्य करार (MoU) केला आहे. हा करार २ जुलै रोजी हायब्रिड बैठकीत औपचारिकरित्या पार पडला.

या करारावर केआयटीचे सचिव  दीपक चौगुले आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या उपकुलगुरू प्रा. जेनिफर हॉवेल यांनी आभासी माध्यमातून स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, आंतरराष्ट्रीय संबंध अधिष्ठाता डॉ. रोहन नलवडे तसेच वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाचे भारतातील प्रोजेक्ट ऑफिसर प्रणव देसाई उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मोहन वनरोट्टी यांनी सांगितले की, या सामंजस्य कराराच्या माध्यमातून भारत–ऑस्ट्रेलिया संयुक्त संशोधन निधीचा प्रभावी वापर करण्याचा संस्थेचा मानस आहे. तसेच एचसीएल टेक यांच्या सहकार्याने अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याचा प्रस्ताव असून, उदयोन्मुख आणि अपारंपरिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्येही स्वतंत्र उत्कृष्टता केंद्रे विकसित करण्याची योजना आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील निधीचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केआयटीच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचा आढावा घेताना चीन, पोलंड आणि युरोपमधील विविध नामांकित विद्यापीठांशी झालेल्या शैक्षणिक सहकार्याचा उल्लेख केला. या साखळीत आता ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाची भर पडल्याने केआयटीच्या जागतिक शैक्षणिक नेटवर्कला नवे बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

या करारामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन संस्कृती आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः सायबर सिक्युरिटी विषयातील मायक्रो-क्रेडेन्शियल अभ्यासक्रम, संयुक्त संशोधन प्रकल्प, प्राध्यापक व संशोधकांची देवाणघेवाण, तसेच ऑस्ट्रेलियामधील इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यावर या करारात विशेष भर देण्यात आला असल्याची माहिती डॉ. रोहन नलवडे यांनी दिली.

केआयटीचे सचिव  दीपक चौगुले यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आंतरराष्ट्रीयीकरण या महत्त्वाच्या उद्दिष्टाची प्रभावी अंमलबजावणी करत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षण व करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या केआयटीच्या प्रयत्नांना या करारामुळे नवी दिशा आणि अधिक गती मिळणार आहे.

या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. साजिद हुदली, उपाध्यक्ष श्री. सचिन मेनन अन्य विश्वस्त यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes