SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कळंबा : ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त सुमारे १८ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभइंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना मोठा दणका; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आज मोठी वाढ‘केआयटी’ च्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांची एकजूट; दिल्लीत ‘अल्युमिनी मीट २०२६’ चा दैदीप्यमान सोहळा उत्साहात जागतिक कुटुंब दिन: नात्यांचा ओलावा आणि समृद्धीचा पायामहाराष्ट्रातील ९.८६ कोटी मतदारांची पडताळणी होणारअल निनोच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवा; जिल्हाधिकाऱ्यांचे विभागनिहाय सविस्तर आदेशकोल्हापूर विमानतळ परिसरातील बांधकाम व घनकचरा व्यवस्थापनबाबत, जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळाआय.ए.एस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची गोकुळ दूध संघाला भेट; दूध प्रक्रिया प्रकल्पाची घेतली माहितीकोल्हापूर महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये सोलर यंत्रणा बसविणार : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडकुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान

जाहिरात

 

कोल्हापूर विमानतळ परिसरातील बांधकाम व घनकचरा व्यवस्थापनबाबत, जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा

schedule14 May 26 person by visibility 237 categoryराज्य

कोल्हापूर  : कोल्हापूर विमानतळ परिघीय क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या तसेच भविष्यात होणाऱ्या बांधकामांच्या नियमितीकरणासाठी आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी, उद्या शुक्रवार १५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता   जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

  भारतीय विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर यांचा ना हरकत दाखला घेणे, अनाधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवणे, तसेच घनकचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावणे या उद्देशाने जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

 विमानतळ फनेल झोनमध्ये होत असलेली अनधिकृत बांधकामे आणि उघड्यावर कचरा जाळण्याच्या प्रकारांमुळे विमानतळ सुरक्षिततेस बाधा निर्माण होऊ नये तसेच याच पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची मानके प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

  कार्यशाळेमध्ये विमानतळ परिसरातील बांधकामांच्या उंचीबाबत घ्यावयाची परवानगी, विमानतळ प्राधिकरणाच्या नियमावली, तसेच आधुनिक व शास्त्रशुद्ध घनकचरा व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी क्रिडाई, कोल्हापूर, अर्किटेक्ट असोसिएशन तसेच उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगाव, मुडशिंगी, सरनोबतवाडी, उंचगाव, गांधीनगर आणि मोरेवाडी येथील लोकप्रतिनिधी व ग्रामसेवकांना आमंत्रित करण्यात आले असून प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी संबंधित विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes