SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कळंबा : ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त सुमारे १८ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभइंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना मोठा दणका; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आज मोठी वाढ‘केआयटी’ च्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांची एकजूट; दिल्लीत ‘अल्युमिनी मीट २०२६’ चा दैदीप्यमान सोहळा उत्साहात जागतिक कुटुंब दिन: नात्यांचा ओलावा आणि समृद्धीचा पायामहाराष्ट्रातील ९.८६ कोटी मतदारांची पडताळणी होणारअल निनोच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवा; जिल्हाधिकाऱ्यांचे विभागनिहाय सविस्तर आदेशकोल्हापूर विमानतळ परिसरातील बांधकाम व घनकचरा व्यवस्थापनबाबत, जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळाआय.ए.एस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची गोकुळ दूध संघाला भेट; दूध प्रक्रिया प्रकल्पाची घेतली माहितीकोल्हापूर महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये सोलर यंत्रणा बसविणार : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडकुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान

जाहिरात

 

कळंबा : ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त सुमारे १८ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

schedule15 May 26 person by visibility 119 categoryसामाजिक

कळंबा : येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त आज १५ मे रोजी सकाळी नऊ वाजता श्री महालक्ष्मी मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला. आज झालेल्या महाप्रसादाचा सुमारे १८ हजार भाविकांनी लाभ घेतला.

ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त आज अशोक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली  देवीची महापूजा बांधली. तर सत्यनारायणाची पूजा श्री व सौ संग्राम जाधव  यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

काल गुरुवारी  होम हवन घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला होता. तसेच दुपारी महिलांसाठी कुंकुमार्चन सोहळा उत्साहात पार पडला, रात्री हनुमान भेटीचा मुख्य पालखी सोहळा मोठ्या भक्ती भावामध्ये पार पडला.

यावेळी लोकनियुक्त सरपंच सुमन विश्वास गुरव, उपसरपंच रोहित जगताप, माजी सरपंच विश्वास गुरव, माजी सरपंच सागर भोगम,  शशिकांत तिवले, अण्णासाहेब बराले, आदींच्या हस्ते महाप्रसाद वाटपास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव,  पुनम  जाधव, रोहित उर्फ राहूल मिरजे, संदिप पाटील,  विकास पोवार, दिपक तिवले. स्वरुप पाटील, नितीश शिंदे, श्रीमती भाग्यश्री पाटोळे, वैशाली टिपुगडे, छाया भवड, मिना गौड, दिपाली रोपळकर, स्नेहल जाधव, आशा टिपुगडे, संगीता माने, तसेच उत्तम जाधव, प्रकाश पाटील -टोपकर, तानाजी पाटील, विश्वास खानविलकर, संभाजी पवार बावडेकर, दिलीप टिपुगडे, धनाजी चौगुले , उदय सुतार, तानाजी साळुंखे, विनायक माने, भगवान पाटील, अरुण टोपकर, रणजीत कोंडेकर, तानाजी पाटील श्री महालक्ष्मी अंबाबाई भक्तगण मंडळ सदस्य, ग्रामस्थ, महिला, गावातील तरुण मंडळाचे सदस्य आदी यावेळी उपस्थित होते,

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes