SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कळंबा : ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त सुमारे १८ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभइंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना मोठा दणका; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आज मोठी वाढ‘केआयटी’ च्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांची एकजूट; दिल्लीत ‘अल्युमिनी मीट २०२६’ चा दैदीप्यमान सोहळा उत्साहात जागतिक कुटुंब दिन: नात्यांचा ओलावा आणि समृद्धीचा पायामहाराष्ट्रातील ९.८६ कोटी मतदारांची पडताळणी होणारअल निनोच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवा; जिल्हाधिकाऱ्यांचे विभागनिहाय सविस्तर आदेशकोल्हापूर विमानतळ परिसरातील बांधकाम व घनकचरा व्यवस्थापनबाबत, जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळाआय.ए.एस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची गोकुळ दूध संघाला भेट; दूध प्रक्रिया प्रकल्पाची घेतली माहितीकोल्हापूर महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये सोलर यंत्रणा बसविणार : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडकुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान

जाहिरात

 

इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना मोठा दणका; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आज मोठी वाढ

schedule15 May 26 person by visibility 158 categoryराज्य

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी दरवाढ जाहीर केली असून, यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. रशिया-युक्रेन आणि मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात आज इंधन दराने या महिन्यातील उच्चांक गाठला असून, यामुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


आज झालेल्या दरवाढीनुसार कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लीटर १०७.६३ रुपये, तर डिझेलचा दर ९४.१५ रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईत पेट्रोल १०६.६८ रुपये आणि डिझेल ९३.१४ रुपये दराने विकले जात आहे. पुण्यातही पेट्रोलसाठी १०६.८२ रुपये आणि डिझेलसाठी ९३.४६ रुपये मोजावे लागत आहेत. नाशिकमध्ये पेट्रोल १०७.९३ रुपये तर डिझेल ९४.४१ रुपये प्रति लीटर झाले आहे. विशेष म्हणजे आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सरासरी ३ ते ३.१४ रुपयांची वाढ करण्यात आली असून एप्रिल २०२२ नंतरची ही सर्वात मोठी दरवाढ असल्याचे मानले जात आहे.

या दरवाढीमुळे केवळ वाहनधारकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही हवालदिल झाले आहेत. इंधन महागल्यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढणार असून त्याचा थेट परिणाम भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची दाट शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घटल्याने कच्च्या तेलाची आयात महागली असून, आगामी काळातही ही दरवाढ कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. या दरवाढीमुळे महागाईचा आलेख पुन्हा एकदा उंचावणार असल्याचे चित्र दिसत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes