SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकअजितदादा पवार यांच्या स्मारकासाठीच्या संभाव्य जागांची महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणीमुंबई शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबवा : पालकमंत्री ॲड.आशिष शेलारडीकेटीई येथे स्व. इंदुमती आवाडे जयंतीनिमित्त अभिवादनबळकट पावलं, सुरक्षित हात! कोल्हापुरी चर्मकलेच्या विकासासाठी महाडिकांचे ऐतिहासिक विधेयकशेतकरी आणि घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा; बिनशेती प्रक्रिया सुलभीकरणाचा निर्णय ऐतिहासिक : प्रकाश आबिटकरई प्रवर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया पुर्ण करावीभावी शिक्षकांनो, 'जनरेशन झेड'साठी आता केवळ बुद्ध्यांक नव्हे, मानसिक स्थैर्यही महत्त्वाचे! : प्रा. अजय साळी ​कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ला पदभ्रमंतीडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

जाहिरात

 

​कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ला पदभ्रमंती

schedule16 Mar 26 person by visibility 111 categoryशैक्षणिक

वारणानगर  : वारणा विद्यापीठ, वारणानगर अंतर्गत असलेल्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे रांगणा किल्ल्यावर पदभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले. 

या पदभ्रमंतीत एनसीसी छात्र सैनिकांनी सुमारे २७ किलोमीटर अंतर पार करत शिस्त, एकता व शारीरिक क्षमतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. अशा किल्ले पदभ्रमंतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये साहसाची भावना वाढते, शारीरिक तंदुरुस्ती सुधारते तसेच इतिहासाची ओळख होण्यास मदत होते.

ही पदभ्रमंती असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. रणजीत नाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. गाईड  संदीप देसाई यांनी किल्ल्याचा इतिहास व गडावरील ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली.

या उपक्रमासाठी वारणा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व आमदार डॉ. विनय कोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी  एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के तसेच श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांचे प्रोत्साहन लाभले. प्राचार्य डॉ. डी. एन. माने व अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांचे सहकार्य लाभले.

या पदभ्रमंतीसाठी एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर इंद्रजीत कोळपे, ज्युनिअर अंडर ऑफिसर अवधूत साळुंखे, वीरसेन चिकने, सार्जंट रूपम मोकाशी, कार्पोरल विश्वजीत कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. छात्र सैनिकांच्या सोबत डॉ. अमोल पाटील, प्रा. बाळकृष्ण पोतदार, प्रा संभाजी शेळके, श्री. सुरज खोत,  विजय चौगुले यांनी सहभाग नोंदवला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes