SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्यदूत प्रशांत साळुंखे यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त पती-पत्नीचा वाचला जीव!​भिमा हेल्थ झोनच्या विस्तारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे १० कोटींचा प्रस्ताव; कृष्णराज महाडिकांच्या प्रयत्नांना वेग.जयसिंगपुरात राजर्षी शाहू महाराज व श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरणगृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन 'हीच खरी शिवसेना', कोल्हापुरातील सभेतून अमित शाहांचे मोठे विधानडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकला भारत सरकारकडून पेटंट१४४५.९७ कोटींच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ'हा देश म्हणजे धर्मशाला नाही!' कोल्हापूरच्या भूमीतून अमित शाह यांचा विरोधकांवर एल्गारजागतिक शरणार्थी दिन: माणुसकीच्या नात्याने संघर्षाला सलामकेंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन व स्वागत

जाहिरात

 

बळकट पावलं, सुरक्षित हात! कोल्हापुरी चर्मकलेच्या विकासासाठी महाडिकांचे ऐतिहासिक विधेयक

schedule16 Mar 26 person by visibility 369 categoryदेश

◼️खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक
 ◼️स्थानिक कारागिरांच्या उपजिविकेची सुरक्षा निश्‍चित करण्याचा प्रयत्न


कोल्हापूर  : खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात कोल्हापुरी चप्पल उद्योगाच्या सुरक्षा आणि प्रगती विषयी विधेयक मांडले आहे. त्यातून कोल्हापूरची ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन करण्यासाठी, खासदार महाडिक यांचा प्रयत्न आहे. चर्म उद्योगातून स्थानिक कारागिरांच्या उपजिविकेची सुरक्षा निश्‍चित करण्यासाठी हे विधेयक महत्वपर्ण आहे.
सध्या नवी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्वाचे विधेयक मांडले. 

कोल्हापुरी लेदर क्राफ्ट प्रिझर्व्हेशन ऍन्ड लाईव्हली हूड सिक्युरिटी बिल या नावाने मांडलेल्या या विधेयकातून पारंपारिक चर्म उद्योगाला सुरक्षा स्थिरता आणि प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. खासदार महाडिक यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर करून, कोल्हापुरी चप्पल आणि अन्य चर्म उत्पादनांचा प्रचार आणि विकास करणे, पारंपारिक कलेचे जतन आणि संरक्षण करणे आणि या क्षेत्रात काम करणार्‍या नोंदणीकृत कामगारांच्या रोजगाराची सुरक्षा अबाधित ठेवणे, हा हेतू असल्याचे स्पष्ट केले.

 कोल्हापुरी चप्पल जगभर प्रसिध्द आहे. याशिवाय विविध प्रकारच्या चर्म उत्पादनांनाही वाढती मागणी आहे. अशा परिस्थितीत खासदार धनंंजय महाडिक यांनी संसदेत सादर केलेले विधेयक अत्यंत महत्वपूर्ण आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes