SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहरातील ५३ रिक्षांवर कारवाई; २३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूलआंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन: सागरी महाकाय जीवांच्या संरक्षणाचा संकल्पआदिवासींनी केलेल्या बांबूच्या राख्यांना शिवाजी विद्यापीठात प्रतिसादगगनबावड्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि वसतिगृहामधील मुलींच्या हस्ते राखी बांधून कृष्णराज महाडिक यांनी केला अनोखा रक्षाबंधन सोहळामुंबईतील ३९ बालगृहांतील ६०० हून अधिक भाऊ-बहिणी रक्षाबंधनानिमित्र एकत्रउंचगाव येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप५ सप्टेंबरला रंगणार युवाशक्ती दहीहंडीचा थरार, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ३ लाख रूपयांचे बक्षीसकागल तालुक्यातील सहा 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूरराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात वॉकेथॉनसहकारी बँकिंग तळागाळातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा: महाव्यवस्थापक सर्वानन एम.

जाहिरात

 

सायबर महाविद्यालयात वारांगना सखी संघटनेसोबत राखी पौर्णिमा उत्साहात

schedule29 Aug 26 person by visibility 271 categoryसामाजिक

कोल्हापूर  : सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत गेली पंधरा वर्षे वारांगणासोबत राखी पौर्णिमा साजरी केली जात असून यावर्षी देखील या संघटनेच्या सदस्यांसोबत राखी पौर्णिमेचा आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना कार्यक्रमाचे आयोजक. प्रा.डॉ दीपक भोसले यांनी प्रास्ताविकात वारांगगणा सखी संघटने सोबतची राखी पौर्णिमा आयुष्याला प्रेरणा देऊन जात असल्याचे सांगितले तर वारांगना सखी संघटनेची अध्यक्षा श्रीमती शारदाताई यादव यांनी वारांगना सखी संघटनेचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर सांगून या संघटनेसमोर असणारी आव्हाने व सामाजिक दृष्टिकोन यावर विवेचन करून समाजाने या घटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवण्याचे आवाहन केले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना समाजकार्य विभागाचे प्राचार्य डॉ. टी.व्ही. जी. शर्मा यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होते असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री मोरे यांनी तर आभार  जयश्री कुरबेटी यांनी तर स्वागत गीत शिवानी  शिंदे यांनी सादर केले कार्यक्रमास सायबर चे प्रशासकीय अधिकारी डॉ. विनायक साळोखे ,डॉ. सुरेश आपटे,प्रा. पूनम माने, प्रा. महेंद्र जनवाडे, प्रा. संध्या तळेकर, प्रा. शिवानी गावडे, प्रा. वसीम सय्यद, किर्लोस्कर कंपनीचे मोहन तायडे, व उपस्थित होते. कार्यक्रमास समाजकार्य विभागातील प्रथम व द्वितीय वर्षातील सुमारे 100 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes