SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहरातील ५३ रिक्षांवर कारवाई; २३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूलआंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन: सागरी महाकाय जीवांच्या संरक्षणाचा संकल्पआदिवासींनी केलेल्या बांबूच्या राख्यांना शिवाजी विद्यापीठात प्रतिसादगगनबावड्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि वसतिगृहामधील मुलींच्या हस्ते राखी बांधून कृष्णराज महाडिक यांनी केला अनोखा रक्षाबंधन सोहळामुंबईतील ३९ बालगृहांतील ६०० हून अधिक भाऊ-बहिणी रक्षाबंधनानिमित्र एकत्रउंचगाव येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप५ सप्टेंबरला रंगणार युवाशक्ती दहीहंडीचा थरार, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ३ लाख रूपयांचे बक्षीसकागल तालुक्यातील सहा 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूरराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात वॉकेथॉनसहकारी बँकिंग तळागाळातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा: महाव्यवस्थापक सर्वानन एम.

जाहिरात

 

मुंबईतील ३९ बालगृहांतील ६०० हून अधिक भाऊ-बहिणी रक्षाबंधनानिमित्र एकत्र

schedule29 Aug 26 person by visibility 194 categoryराज्य

◼️  ‘टीम अवर चिल्ड्रन्स’चा अनोखा उपक्रम

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विविध ३९ बालगृहांमध्ये राहणाऱ्या ६०० हून अधिक भाऊ-बहिणींना  ‘टीम अवर चिल्ड्रन्स’ने रक्षाबंधनानिमित्त एकत्र आणले. सायन येथील श्री मानव सेवा संघ येथे रक्षाबंधन उत्साहात झाले.

बालगृहांमध्ये आश्रय घेणाऱ्या बालकांसाठी हा सोहळा केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळा अनुभवण्याचा अनोखा क्षण ठरला. विविध बालगृहांमधून आलेली भावंडे एकमेकांना भेटताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून बालकांना प्रेम, सुरक्षितता, आपलेपणा आणि एकमेकांच्या सहवासाची जाणीव अनुभवता आली. भावंडांनी एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत हा दिवस आनंदात साजरा केला.

‘टीम अवर चिल्ड्रन्स’च्या या उपक्रमामुळे बालकांना कौटुंबिक जिव्हाळ्याच्या भावनेचा अनुभव मिळाला. बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि आनंद हाच या सोहळ्याचा खरा उद्देश व यश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes