SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय ओव्हरडोझ जनजागृती दिन: व्यसनमुक्ती आणि संवर्धनाचा संदेशजिजाऊ बसमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल : आमदार यड्रावकररक्षाबंधन प्रेम, श्रद्धा, समता आणि संरक्षणाची भावना दृढ करण्याचा दिवस : मुनिश्री सारस्वत सागरजी महाराजऑलिपिकवीर खाशाबा चरित्र सर्वांना नेहमी प्रेरणादायी : पै. विष्णु जोशीलकरराष्ट्रीय महामार्गावरील कागलमधील पिलरचा पूल देशात सर्वात सुंदर बनेल : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ DKTE पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनी बुद्धिबळाच्या सिमलटेनियस प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसादडी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्सकै. आनंदराव जाधव सेवा संस्था ही स्वातंत्र्यसैनिकांनी लावलेली ज्योत : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादनझोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर मूलभूत सुविधाही पुरविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;बालकांच्या संविधानिक हक्कांवरील ‘कलरिंग बुक’चे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

जाहिरात

 

गगनबावड्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि वसतिगृहामधील मुलींच्या हस्ते राखी बांधून कृष्णराज महाडिक यांनी केला अनोखा रक्षाबंधन सोहळा

schedule29 Aug 26 person by visibility 250 categoryसामाजिक

कोल्हापूर  : केंद्र सरकार पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या गगनबावडा इथल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि वसतिगृहात रक्षाबंधन स्नेहमेळा उत्साहात संपन्न झाला. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यालयातील मुलींनी महाडिक यांना राख्या बांधून स्नेहभाव जपला. 

मुलींच्या शिक्षणासाठी इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड भेट देत कृष्णराज महाडिक यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव सोबत राहण्याचं आश्वासन दिले.

   सारे शिकूया... पुढे जाऊया...या उद्देशाने शासनाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या गगनबावडा मधील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि वसतिगृहात रक्षाबंधन स्नेहमेळा पार पडला. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यालयातील मुलींनी कृष्णराज महाडिक यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा अनोखा आणि भावनिक सोहळा साजरा केला. तर रक्षाबंधन भेट म्हणून कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते मुलींच्या आधुनिक शिक्षणासाठी इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी ही भेट निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. यावेळी मुलींशी संवाद साधत कृष्णराज महाडिक यांनी, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील मुलींना देशाच्या सर्वोच्चस्थानी पाहण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगितले. तसेच मुलींना हक्काचा भाऊ म्हणून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत आणि करिअरच्या निवडीमध्ये आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन त्यांनी दिले. वसतिगृहातील मुलींसाठी आवश्यक असणार्‍या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कृष्णराज महाडिक यांनी वसतिगृहातील स्वयंपाकघरासह विविध विभागांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. विद्यार्थिनींशी संवाद साधत स्वतःचं करिअर कसे निवडावे, ध्येय निश्चित करून त्यासाठी जिद्द आणि सातत्याने प्रयत्न कसे करावेत, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊ, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलींनी शिक्षणाच्या बळावर मोठी स्वप्ने पूर्ण करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

 याप्रसंगी गगनबावडा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी वसुंधरा कदम यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देत त्यांच्या वसतिगृह भेटीमागील उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ कुंभार, केंद्रप्रमुख श्रीरंग माने, गृहप्रमुख गीता पाटील आणि निशा सुतार, मुख्याध्यापक रंगराव गोसावी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसंच युवा मोर्चाचे सदस्य सचिन जाधव, जावेद अत्तार, उत्तम बंडागळे, नारायण पाटील, अजित दळवी, विशाल पवार, अजित भोसले, रोहित गावकर, युवराज पाटील, विश्वास केतन, गणेश महाडिक, तेजस डाकवे, अविनाश बंडागळे, विष्णुदास गावकर, संदीप गावकर, दीपराज गावकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes