SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीत‘फ्युचर रेडी इंजिनिअर्स प्रोग्राम २०२६–२७’चे उद्घाटनवारणा उद्योग समूहाकडून शेतकरी, कामगारांची दिवाळी गोड; दिवाळी सणानिमित्त सुमारे १२५ कोटी रुपयांचे वितरणकोल्हापूर महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची विशेष मोहीमविनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी शहरातील 11 आस्थापने सीलकोल्हापूर : अनधिकृत फटाका विक्री केल्यास २ हजार रुपये दंड; फटाका स्टॉलसाठी निश्चित केलेल्या जागेवरच विक्रीस परवानगीगांधीनगर बाजारपेठेत दिवाळीत भारनियमन नको; करवीर शिवसेनेचा महावितरणला इशारा‘केआयटी’त सायबर सुरक्षा विषयात विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे‘गोकुळ’ची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विक्रमी २१ लाख ७० हजार लिटर दूध विक्री!शिरढोण येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीजागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन: महत्त्व आणि जतनाची गरज

जाहिरात

 

उदय कुलकर्णी यांच्या आठवणींचे संकलन करून स्मृतीग्रंथ प्रकाशित करा

schedule25 Oct 26 person by visibility 287 categoryसामाजिक

◼️ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांच्या आदरांजली सभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सूर; २५ हजारांच्या 'पर्यावरण पुरस्कारा'ची घोषणा

कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार कै. उदय कुलकर्णी हे अतिशय व्यासंगी पत्रकार होते. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाच्या प्रवासात त्यांचे योगदान फार मोठे राहिलेले आहे. त्यामुळे असा व्यासंग असणाऱ्या पत्रकारांसाठी 'उदय कुलकर्णी व्यासंगी पत्रकार पुरस्कार' सुरू करण्यात यावा, तसेच समाजातील विविध सामाजिक संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्या आठवणींचे संकलन करून स्मृतीग्रंथ प्रकाशित करण्यात यावा, अशा भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या. कोल्हापूर प्रेस क्लब आणि दिलासा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कॉमर्स कॉलेजच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांच्यासाठी भावपूर्ण आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले व माजी संपादक श्रीराम पवार यांनी आपल्या भावना मांडल्या.
यावेळी बोलताना माजी संपादक श्रीराम पवार म्हणाले की, कोल्हापूर शहराच्या संदर्भात महापूर, रंकाळा, पर्यावरण आणि पंचगंगा प्रदूषण यांसारख्या गंभीर प्रश्नांवर उदय कुलकर्णी यांनी वेळीच अनेक धोके दाखवून दिले होते. मात्र दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष झाले, ज्याच्या झळा आज आपण सर्वजण भोगत आहोत. त्यामुळे आता त्यांनी घालून दिलेल्या वैचारिक पायंड्यावर पुढे जाणे हीच काळाची खरी गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी पत्रकारांचे खंदे मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांचे विचार वृत्तपत्र सृष्टीला कायम दिशा दाखवत राहतील असे नमूद केले. दिलासा संस्थेच्या प्रा. डॉ. रूपा शहा यांनी उदय कुलकर्णी यांच्यासोबतच्या ४५ वर्षांच्या अखंड सहवासातील आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक करताना समीर देशपांडे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडणारा सच्चा पत्रकार अशा शब्दांत त्यांचा गौरव केला.

 या सभेत सावली परिवारातर्फे दरवर्षी २५ हजार रुपये रोख, मानपत्र व स्मृतीचिन्ह अशा स्वरूपाचा 'उदय कुलकर्णी पर्यावरण जागृती पुरस्कार' देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा किशोर देशपांडे यांनी केली.

या आदरांजली सभेत चेतना संस्थेचे पवन खेबुडकर, कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे दिलीप बापट, निसर्गमित्राचे अनिल चौगुले, रंगकर्मी रविदर्शन कुलकर्णी, किरणसिंह चव्हाण, प्रतिज्ञा नाट्यरंगचे प्रशांत जोशी, नंदकुमार ओतारी, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे रघुनाथ कांबळे, शिवाजी विद्यापीठाच्या चित्रपट निर्मिती विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी जाधव, हृदयस्पर्शचे पद्माकर कापसे, शाहीर राजू राऊत, पत्रकार राजेंद्र मकोटे आणि दैनिक सकाळचे निखिल पंडितराव यांनी मनोगतातून आदरांजली वाहिली. यावेळी कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण, जलसाक्षरता व आरोग्य प्रबोधन क्षेत्रांतील विविध संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes