SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार जाहीरइचलकरंजी: स्वातंत्र्यदिनानिमित्त 'केन चेस अकॅडमी'तर्फे भव्य मोफत बुद्धिबळ कॅम्प उत्साहात अभियंत्यांच्या योगदानातून साकारेल आत्मनिर्भर भारत : मेजर अभिजीत ताम्हणकर; केआयटी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात स्वातंत्र्यदिनासोबत रगडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळाशाहूवाडीच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन; राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळाक्रांतिवीर मदनलाल धिंग्रा: मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणारा अमर हुतात्मामाजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वनसैनिक टाकळी एमआयडीसीचा विरोध खरा, की यड्रावकरांना घेरण्याचा डाव? मार्केट कमिटीच्या बैठकीनंतर शिरोळ तालुक्यात जोरदार चर्चाकोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होईल : माजी सरन्यायाधीश भूषण आर. गवईअभियंत्यांनी नोकरी शोधणारे नाही, तर नोकऱ्या देणारे व्हावे " राज्यपाल जिष्णु देव वर्मा

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार जाहीर

schedule17 Aug 26 person by visibility 106 categoryसामाजिक

◼️कोल्हापुरात २१ ऑगस्टला प्रदान समारंभ

कोल्हापूर : पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा "लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार" शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती व संयोजक डॉ. पांडुरंग भोसले यांनी आज ही घोषणा केली.

ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात होणार आहे.

त्याचप्रमाणे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिभा पुरस्कार निपाणी येथील ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. एन. डी. जत्राटकर आणि ईश्वरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ. संजय थोरात यांना याच समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. पाली-मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या स्मरणार्थ सदर पुरस्कार देण्यात येतात.

या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

साहित्य परिषदेचे पुरुषोत्तम सदाफुले, आनंदा कांबळे, विजय कांबळे, रविंद्र भारती, निमिषा भारती, शार्दुल भारती आदी या कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes