SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात १ कोटी ९५ लाखांची गोव्यातील अवैध दारू जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाईसहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही मतदानास पात्रडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवडकोल्हापूर : रंकाळा परिसरातील अनधिकृत हातगाडयांविरोधात व्यापक मोहीम ; विभागांनी समन्वयाने कारवाई करावी : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडकेडीसीसी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाचा तिसरा हप्ता वर्ग; गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यात उत्साह आणि आनंद येत्या महिन्याभरात विविध मंत्र्याकडे बैठका लावणार : मंत्री हसन मुश्रीफशिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार जाहीरइचलकरंजी: स्वातंत्र्यदिनानिमित्त 'केन चेस अकॅडमी'तर्फे भव्य मोफत बुद्धिबळ कॅम्प उत्साहात अभियंत्यांच्या योगदानातून साकारेल आत्मनिर्भर भारत : मेजर अभिजीत ताम्हणकर; केआयटी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात स्वातंत्र्यदिनासोबत रगडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळा

जाहिरात

 

सैनिक टाकळी एमआयडीसीचा विरोध खरा, की यड्रावकरांना घेरण्याचा डाव? मार्केट कमिटीच्या बैठकीनंतर शिरोळ तालुक्यात जोरदार चर्चा

schedule16 Aug 26 person by visibility 383 categoryउद्योग

शिरोळ : सैनिक टाकळी येथे प्रस्तावित शासकीय एमआयडीसीच्या मुद्द्यावरून शनिवारी शिरोळ तालुक्यात राजकीय विरोध पाहायला मिळाला. एमआयडीसीला विरोध असल्याचे सांगत तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. मात्र, त्यानंतर रत्नपाण्णा कुंभार मार्केट यार्ड येथे झालेल्या बैठकीत आंदोलकांच्या पेक्षा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना वारंवार विरोध करणारे राजकीय पुढारी बैठकीत उपस्थित असल्याने या आंदोलनाला राजकीय वळण मिळाल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. त्यामुळे हा विरोध प्रस्तावित एमआयडीसीला आहे की आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आहे ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या संदर्भात चर्चेच्या उद्देशाने मार्केट यार्ड येथे शनिवारी दुपारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची उपस्थिती होती. मात्र, एमआयडीसीला विरोध करणाऱ्या सैनिक टाकळीतील स्थानिक नागरिकांची संख्या बोटावर मोजण्याइतपत होती, त्याउलट आमदार यड्रावकर यांना सातत्याने विरोध करणारे काही राजकीय चेहरे अधिक ठळकपणे उपस्थित होते.

सैनिक टाकळी येथे एमआयडीसी झाल्यास स्थानिक युवकांना रोजगार, महिलांसाठी उद्योगाच्या संधी आणि परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे विकासाच्या प्रकल्पाला विरोध करण्याऐवजी नागरिकांच्या शंकांचे निरसन करून सकारात्मक मार्ग काढण्याची भूमिका आमदार यड्रावकर यांच्याकडून वारंवार मांडली जात आहे.

दरम्यान, एमआयडीसीच्या नावाखाली सुरू असलेल्या आंदोलनामागे स्थानिकांचा खरा प्रश्न किती आणि राजकीय विरोध किती ?  याबाबत तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes