कोल्हापूर जिल्ह्यात 12 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागू
schedule30 Jul 26 person by visibility 116 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी 31 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत बंदी आदेश जारी केला आहे.
हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस विभागाची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना तसेच लग्न, इतर धार्मिक समारंभ, यात्रा, सण, प्रेतयात्रा आदींना लागू असणार नाही.