SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुली आहेत म्हणून थेट गर्भपात! कोल्हापुरात डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्या 'प्रतिमा हॉस्पिटल'वर पोलिसांचा दणका; २०० ते २५० अवैध गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली!प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा होणे आवश्यक : जिल्हाधिकारीज्ञानज्योती शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त विविध माध्यमिक विद्यालयांमध्ये वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटपकेएमटीच्या ताफ्यात पहिल्या तीन वातानुकूलित ई-बसेस दाखल; लवकरच नियमित सेवेत : सभापती सत्यजित जाधवमहिलांनी निर्भयपणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा : पोलीस उपनिरीक्षक मयूश्वरी खरात; डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यानराधानगरी भरले 99.51 टक्के; कोल्हापूर जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखालीकोल्हापूर जिल्ह्यात 12 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागूएक थरार....बालंबाल बचावलो.. .डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा ‘बेस्ट इन्स्टिट्यूट’ पुरस्काराने सन्मान; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते गौरव स्वमान सोशल मानवाधिकार परिषद संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नारायण पोवार यांचा सत्कार

जाहिरात

 

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा ‘बेस्ट इन्स्टिट्यूट’ पुरस्काराने सन्मान; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते गौरव

schedule30 Jul 26 person by visibility 114 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : गेल्या तीन दशकाहून अधिक काळ गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासाठी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूरचा ‘बेस्ट इन्स्टिट्यूट इन मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.  राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा आणि सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी जायंट्स वेल्फेअर फौंडेशनच्या जागतिक अध्यक्षा शायना एन. सी., अभिनेत्री हरनाज कौर संधू, ए. श्रीनिवास, ब्रजमोहन पांडे यांच्यासह वैद्यकीय व सामजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुंबईतील  हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आयोजित ‘नवभारत हेल्थकेअर समिट २०२६’ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्यकीय सेवेमध्ये उत्कृष्टता, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या कार्याचे विशेष कौतुक केले. 

 १९८९ मध्ये कोल्हापूरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजने कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३६ वर्षात अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट वैदयकीय शिक्षण, डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव शिक्षण देत हजारो गुणवंत डॉक्टर्स घडवले आहेत. राज्याची व देशाची आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात या महाविद्यालयाने मोठे योगदान दिले आहे.

 उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन महाविद्यालय सातत्याने नवनवे उपक्रम राबवून आरोग्य व्यवस्थेसाठी अखंड योगदान देत आहे. या कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. 

या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा,  कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले,   वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी मेडीकल कॉलेज व हॉस्पिटलच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes