SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुली आहेत म्हणून थेट गर्भपात! कोल्हापुरात डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्या 'प्रतिमा हॉस्पिटल'वर पोलिसांचा दणका; २०० ते २५० अवैध गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली!प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा होणे आवश्यक : जिल्हाधिकारीज्ञानज्योती शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त विविध माध्यमिक विद्यालयांमध्ये वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटपकेएमटीच्या ताफ्यात पहिल्या तीन वातानुकूलित ई-बसेस दाखल; लवकरच नियमित सेवेत : सभापती सत्यजित जाधवमहिलांनी निर्भयपणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा : पोलीस उपनिरीक्षक मयूश्वरी खरात; डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यानराधानगरी भरले 99.51 टक्के; कोल्हापूर जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखालीकोल्हापूर जिल्ह्यात 12 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागूएक थरार....बालंबाल बचावलो.. .डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा ‘बेस्ट इन्स्टिट्यूट’ पुरस्काराने सन्मान; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते गौरव स्वमान सोशल मानवाधिकार परिषद संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नारायण पोवार यांचा सत्कार

जाहिरात

 

स्वमान सोशल मानवाधिकार परिषद संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नारायण पोवार यांचा सत्कार

schedule30 Jul 26 person by visibility 212 categoryसामाजिक

 कोल्हापूर : समाजात ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या ज्या कोणावर अन्याय-अत्याचार होईल, त्या त्या ठिकाणी संविधानात्मक अधिकाराने न्यायासाठी, अन्यायग्रस्त व्यक्तींच्या तक्रारींचे निवारण करीत त्यांना कायदेशीर न्याय मिळवून देण्याचे काम आपली संघटना पूर्ण ताकदीने करेल, असा विश्वास स्वमान सोशल मानवाधिकार परिषद संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व नूतन ॲडव्होकेट नारायण पोवार यांनी व्यक्त केला.
बुधवार, दिनांक २९ जुलै  रोजी गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून, संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नारायण पोवार यांनी वकील पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार संघटनेचे राष्ट्रीय संघटक पारस ओसवाल यांच्या हस्ते न्यू शाहूपुरी येथील कार्यालयात पार पडला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राष्ट्रीय संघटक पारस ओसवाल म्हणाले की, आज अशा संघटनांची समाजाला मोठी गरज आहे. आपण संविधानाने दिलेल्या चौकटीत राहून मानवाच्या संविधानात्मक अधिकारासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करूया. कोल्हापुरातील आंदोलन असो वा एखादे सार्वजनिक सामाजिक काम असो, त्याचा देशपातळीवर विचार केला जातो. अशा प्रकारे एक रोल मॉडेल म्हणून आपल्या संघटनेचे काम करू, जेणेकरून आपल्या कामाची नोंद देशपातळीवर घेतली जाईल.


गावातील स्मशानभूमी परिसराची स्वच्छता असो, विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठीचा यशस्वी लढा असो अथवा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या माध्यमातून उठवलेला आवाज असो; नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या नारायण पोवार यांनी वकील पदवी संपादन केल्याने त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांना या पदवीचा फार मोठा आधार मिळणार आहे, असे सांगत ओसवाल यांनी त्यांचा गौरव केला.

यावेळी महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा पूनम मोरे यांनी, अन्यायग्रस्तांनी आपल्याला योग्य न्याय मिळण्यासाठी स्वमान सोशल मानवाधिकार परिषद संघटनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. 

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय संघटक पारस ओसवाल यांचे स्वागत कोल्हापूर व गोवा राज्य कार्याध्यक्ष उदय चौगले यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन  केली. या सत्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा पूनम मोरे, पश्चिम महाराष्ट्र महिला कार्याध्यक्षा लता पाटील, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजकुमार पाटील, सुजित जाधव, मधुकर काशिद, दशरथ बागडी, रामचंद्र हरणे, उमेश शिंदे, अनिल कुंभार (पुणे), सुनील दादा (आर्मी रिटायर) आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes