मास मीडियातून जनहिताला प्राधान्य द्या: प्रा. डॉ. ज्योती जाधव
schedule09 Aug 26 person by visibility 257 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : समाजात मास मीडियाची भूमिका महत्त्वाची असून विविध माध्यमात नवनियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव यांनी केले.
मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने नुकत्याच विविध माध्यमातून जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. बीबीसी न्यूज मराठीला निवड झाल्याबद्दल साई सिमरन घाशी या विद्यार्थिनीचा प्रा. डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गेल्या तीन वर्षात मास कम्युनिकेशन विभागाचे तीसहून अधिक विद्यार्थी स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमात जॉईन झाले आहेत.
प्रस्ताविक मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. यावेळी सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.