SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक सिंह दिन: जंगलाच्या राजाचे जतन आणि संवर्धनकोल्हापुरात १८५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन; हद्दवाढीसह विविध प्रकल्पांना गतीविभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्यावत सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी लवकरच मंजुरी देण्यात येईल : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारराज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिवसा मोफत वीज आणि थकबाकीमुक्त प्रमाणपत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससैनिक टाकळी एमआयडीसीवरून आंदोलक आणि आमदार यड्रावकर यांच्यातील चर्चा फिस्कटलीमास मीडियातून जनहिताला प्राधान्य द्या: प्रा. डॉ. ज्योती जाधवए.आय. ज्ञाननिर्मितीचे नव्हे; माहितीचे साधन: डॉ. ज्ञानेश्वर गटकरमहापालिकेच्यावतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पणपद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य सामान्य माणसाला दिलासा देणारे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे आगमन

जाहिरात

 

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य सामान्य माणसाला दिलासा देणारे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule09 Aug 26 person by visibility 464 categoryसामाजिक

कोल्हापूर : शिक्षण, सहकार, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रचंड मोठे कार्य उभे केले. त्यांनी सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांच्या यशवंत निवासस्थानी भेट देऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,  उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, आमदार  शिवाजी पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. 

त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, राज्यपाल म्हणून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी तीन राज्यांची जबाबदारी पार पाडली. त्यापूर्वी आमदार तसेच अन्य निरनिराळ्या पदांवर काम करताना प्रत्येक कामात त्यांनी आपला एक ठसा उमटवला. ते केवळ नेते नव्हते, तर ते एक विचारवंत होते. एक कृतार्थ जीवन डी. वाय. दादा जगले. संपूर्ण जीवनाला समृद्ध करेल, असा विचार त्यांच्याकडे होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी, कुटुंबियांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे विचार जपण्याचे कार्य केले आहे. त्यांच्यासारखे नेते आपल्यातून निघून जाणे ही  महाराष्ट्राकरिता मोठी हानी आहे. 

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

_______________________________________


उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

______________________________________

महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

कोल्हापूर : महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी रविवारी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes