SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक सिंह दिन: जंगलाच्या राजाचे जतन आणि संवर्धनकोल्हापुरात १८५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन; हद्दवाढीसह विविध प्रकल्पांना गतीविभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्यावत सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी लवकरच मंजुरी देण्यात येईल : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारराज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिवसा मोफत वीज आणि थकबाकीमुक्त प्रमाणपत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससैनिक टाकळी एमआयडीसीवरून आंदोलक आणि आमदार यड्रावकर यांच्यातील चर्चा फिस्कटलीमास मीडियातून जनहिताला प्राधान्य द्या: प्रा. डॉ. ज्योती जाधवए.आय. ज्ञाननिर्मितीचे नव्हे; माहितीचे साधन: डॉ. ज्ञानेश्वर गटकरमहापालिकेच्यावतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पणपद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य सामान्य माणसाला दिलासा देणारे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे आगमन

जाहिरात

 

विभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्यावत सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी लवकरच मंजुरी देण्यात येईल : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

schedule09 Aug 26 person by visibility 211 categoryराज्य

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्ययावत सोई -सुविधा उपलब्ध करण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल समितीने शासनाकडे सादर केलेल्या 195 कोटी रुपयांच्या आराखड्यास लवकरच मंजूरी देण्यात येईल, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी दिली.

विभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्ययावत सोई-सुविधा उपलब्ध करण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल समितीने शासनाकडे सादर केलेल्या आराखड्या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर क्रिडा विभागाचे उपसंचालक सुहास पाटील उपस्थित होते.

 यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी विभागीय क्रीडा संकुल समितीने शासनाकडे सादर केलेल्या रुपयांच्या आराखड्याची माहिती घेवून कोल्हापूरच्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी केली असून येथे अद्यावत सुविधांची अत्यंत गरज असल्याने हा आराखडा मंजूर करण्याबाबत राज्य क्रीडा विकास समिती यांचे द्वारा प्रस्ताव मंजुरीची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes