SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जैवविविधतेचा रक्षक: जागतिक जॅग्वार दिनसंजय घोडावत इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूल व ज्युनि कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ उत्साहातडिलिमिटेशनवरून महाविकास आघाडीत ठिणगी! पवारांच्या भूमिकेचे मुश्रीफांकडून स्वागत; वडेट्टीवार-राऊतांचा समाचार‘गोकुळ’च्या प्रगतीत प्राथमिक दूध संस्था कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा : चेअरमन राजेश पाटीलविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे : डॉ. अजितकुमार पाटीलनैतिक मूल्यांची रुजवणूक करणारी ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ जिल्ह्यात उत्साहात; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागसरोज पाटील यांना 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' जाहीर; शनिवारी वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळाधैर्यशील भोसलेची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटूचा मानभारतीय लोकशाही टिकविण्यासाठी संविधानिक मूल्यांचे जतन आवश्यक : प्रा. डॉ. प्रवीण पाटील‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर जि.प. सदस्या विनिता भोगम ॲक्शन मोडवर

जाहिरात

 

भारतीय लोकशाही टिकविण्यासाठी संविधानिक मूल्यांचे जतन आवश्यक : प्रा. डॉ. प्रवीण पाटील

schedule28 Nov 26 person by visibility 234 categoryसामाजिक

कोल्हापूर : भारतीय लोकशाही अधिक सक्षम आणि टिकवून ठेवण्यासाठी संविधानातील मूल्यांचे जतन व संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे,असे प्रतिपादन शहाजी लॉ कॉलेजचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.प्रवीण पाटील यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र आणि समाज कल्याण विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त ‘संविधानिक मूल्ये व भारतीय लोकशाही’ या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते  प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्राच्या संचालक डॉ.प्रतिभा पाटणकर होत्या. यावेळी समाज कल्याण विभागाचे सह आयुक्त सचिन साळे, उपकुलसचिव श्री. विनय शिंदे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा.डॉ.पाटील म्हणाले की,भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेतील सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य ही मूल्ये भारतीय लोकशाहीमध्ये विशेष महत्त्वाची आहेत. ही मूल्ये भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया असून, त्यांच्या आधारेच देशाची लोकशाही व्यवस्था टिकून आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्यांचा आदर करून त्यांचे आचरणात पालन करणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही संविधानाने दिलेली मूलभूत मूल्ये आजच्या सामाजिक परिस्थितीत अधिक महत्त्वाची आहेत. समाजातील विषमता दूर करण्यासाठी, सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी या मूल्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी संविधानिक मूल्यांची जाणीव प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण झाली पाहिजे,असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संचालक डॉ. प्रतिभा पाटणकर म्हणाल्या की, भारतीय राज्यघटनेचे महत्त्व जाणून घेणे आणि लोकशाही मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. संविधानातील मूल्यांचे पालन केल्याने लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते.

यावेळी समाज कल्याण विभागाचे सह आयुक्त श्री.सचिन साळे म्हणाले की,भारतीय राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांना अनुसरून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी समाज कल्याण विभाग कार्यरत आहे. सामाजिक व शैक्षणिक धोरणांच्या माध्यमातून विभाग समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.सचिन भोसले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.नितीन रणदिवे यांनी केले, तर डॉ.सूर्यकांत गायकवाड यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes