SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जैवविविधतेचा रक्षक: जागतिक जॅग्वार दिनसंजय घोडावत इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूल व ज्युनि कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ उत्साहातडिलिमिटेशनवरून महाविकास आघाडीत ठिणगी! पवारांच्या भूमिकेचे मुश्रीफांकडून स्वागत; वडेट्टीवार-राऊतांचा समाचार‘गोकुळ’च्या प्रगतीत प्राथमिक दूध संस्था कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा : चेअरमन राजेश पाटीलविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे : डॉ. अजितकुमार पाटीलनैतिक मूल्यांची रुजवणूक करणारी ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ जिल्ह्यात उत्साहात; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागसरोज पाटील यांना 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' जाहीर; शनिवारी वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळाधैर्यशील भोसलेची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटूचा मानभारतीय लोकशाही टिकविण्यासाठी संविधानिक मूल्यांचे जतन आवश्यक : प्रा. डॉ. प्रवीण पाटील‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर जि.प. सदस्या विनिता भोगम ॲक्शन मोडवर

जाहिरात

 

धैर्यशील भोसलेची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटूचा मान

schedule28 Nov 26 person by visibility 269 categoryक्रीडा

कोल्हापूर : अंतरविभागीय क्रीडा परिषद २०२६-२७ अंतर्गत विद्या प्रसारक मंडळ व गडहिंग्लज येथील डॉ. घाळी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने २७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित अंतरविभागीय जलतरण स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या School of Engineering and Technology या अधिविभागात चौथ्या वर्षात शिकणाऱ्या धैर्यशील किरण भोसले याने घवघवीत यश संपादन केले. विविध जलतरण प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत त्याने ५ सुवर्ण व ४ रौप्य अशी एकूण ९ पदके पटकावली. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याने सलग तिसऱ्या वर्षी 'सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटू' हा बहुमान प्राप्त केला आहे.

धैर्यशीलच्या या यशाला आणखी एक महत्त्वपूर्ण जोड मिळाली असून, चेन्नई (तामिळनाडू) येथे १६ ते २२ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
या यशस्वी कामगिरीसाठी शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. डॉ. आर. के. कामत, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. ए. बी. कोळेकर व क्रीडा समन्वयक डॉ. प्रविण सावंत यांनी धैर्यशीलचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याला प्रशिक्षक श्री. प्रभाकर डांगे यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.

धैर्यशीलच्या या दैदीप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेतही तो उत्कृष्ट कामगिरी करून शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes