SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जैवविविधतेचा रक्षक: जागतिक जॅग्वार दिनसंजय घोडावत इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूल व ज्युनि कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ उत्साहातडिलिमिटेशनवरून महाविकास आघाडीत ठिणगी! पवारांच्या भूमिकेचे मुश्रीफांकडून स्वागत; वडेट्टीवार-राऊतांचा समाचार‘गोकुळ’च्या प्रगतीत प्राथमिक दूध संस्था कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा : चेअरमन राजेश पाटीलविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे : डॉ. अजितकुमार पाटीलनैतिक मूल्यांची रुजवणूक करणारी ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ जिल्ह्यात उत्साहात; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागसरोज पाटील यांना 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' जाहीर; शनिवारी वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळाधैर्यशील भोसलेची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटूचा मानभारतीय लोकशाही टिकविण्यासाठी संविधानिक मूल्यांचे जतन आवश्यक : प्रा. डॉ. प्रवीण पाटील‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर जि.प. सदस्या विनिता भोगम ॲक्शन मोडवर

जाहिरात

 

सरोज पाटील यांना 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' जाहीर; शनिवारी वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा

schedule28 Nov 26 person by visibility 181 categoryसामाजिक

कोल्हापूर : कै. सौ. हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट, राज प्रकाशन व राजर्षी शाहू अध्यासनाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या आणि विवेकवादी विचारवंत सरोज नारायण (एन. डी.) पाटील (माई) यांना जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्काराचे वितरण येत्या शनिवारी, ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता साने गुरुजी वसाहत परिसरातील सूर्यवंशी कॉलनीतील मृत्युंजय सांस्कृतिक सभागृह येथे पार पडणार आहे. बालकल्याण संकुलाचे ज्येष्ठ विश्वस्त सुरेश शिपूरकर यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून, सन्मानचिन्ह, ग्रंथ, शाल आणि रोख ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सरोज पाटील या रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्या म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण आणि समाजकारणासोबतच त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा म्हणूनही सक्रिय योगदान देत आहेत. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून, यापूर्वी पद्मजा तिवले, प्रा. डॉ. ज्योती जाधव आणि प्रा. सौ. स्वाती कोरी या मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

‘जननायक राजर्षी शाहू महाराज’ पुस्तकाचे प्रकाशन
याच कार्यक्रमात पवार ट्रस्टच्या खजिनदार श्रद्धा पवार लिखित 'जननायक राजर्षी शाहू महाराज' या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व लेखिका वसुधा जयसिंगराव पवार या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील.

कार्यक्रमास श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सुमनताई वसंतराव देशमुख, श्रीराम ज्ञानपीठ (वाशी) च्या संचालिका अनिता भीमराव पाटील, नगरसेविका संगीता संजय सावंत आणि मंत्रालयातील अवर सचिव राजकुंवर संदीप डफळे-पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी प्रा. डॉ. दिग्विजय पवार, बी. ए. पाटील, प्राचार्य डॉ. दिनकर पाटील, बबनराव रानगे, विलास पाटील आणि पांडुरंग माळी आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes