SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघामार्फत म्हशीच्या दुधाला ३ रुपये आणि गाईच्या दुधाला २ रुपये दरवाढ दिल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी मानले संचालकांचे आभारबेसमेंटमधील पाणी ड्रेनेज लाईनमध्ये सोडल्याप्रकरणी वरद डेव्हलपर्सला १० हजारांचा दंडउंबरमाळी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ उत्साहातकार्तिक शुद्ध एकादशी निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग, वारकऱ्यांसमवेत भक्तीरसात तल्लीनसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. रईसा मुल्ला यांना पीएच.डी. पदवी प्रदानअब्दुललाटच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५८२ नागरिकांची तपासणीगोकुळची दूध दरवाढ तातडीने रद्द करा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन; प्रांत उपभोक्ता संरक्षण परिषद समितीच्या पूनमताई तोडकर यांचा इशारागोरगरिबांच्या आशीर्वादाने माझी नोका पैलतीराला लागेल; मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गारकोल्हापूर शहरातील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या चार आस्थापना सील

जाहिरात

 

गोकुळची दूध दरवाढ तातडीने रद्द करा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन; प्रांत उपभोक्ता संरक्षण परिषद समितीच्या पूनमताई तोडकर यांचा इशारा

schedule21 Nov 26 person by visibility 285 categoryसामाजिक

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) २१ नोव्हेंबर २०२६ पासून लागू करण्यात आलेली दूध दरवाढ तातडीने रद्द करावी किंवा कमी करून सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रांत उपभोक्ता संरक्षण परिषद समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात समितीच्या कार्याध्यक्षा पूनमताई तोडकर यांनी गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश  गोडबोले यांना निवेदन सादर केले.

गोकुळ दूध संघाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार फुल क्रीम दूध दरात प्रतिलिटर ६ रुपये, तर गाय, टोन्ड व प्रमाणित दूध दरात प्रतिलिटर ४ रुपये इतकी वाढ केली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात अन्नधान्य, गॅस, वीज, शिक्षण आणि आरोग्याच्या वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित आधीच बिघडले आहे. त्यातच लहान मुले, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग असलेल्या दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांवर अन्यायकारक आर्थिक भार पडत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

"आमची भूमिका दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात अजिबात नाही; शेतकऱ्यांना योग्य दर मिळायलाच हवा, मात्र शेतकऱ्यांचे हित जपताना ग्राहकांची क्रयशक्ती आणि हित यांचाही समतोल साधणे ही गोकुळसारख्या सहकारी संस्थेची जबाबदारी आहे," असे पूनमताई तोडकर यांनी स्पष्ट केले.

◼️निवेदनातील प्रमुख मागण्या:
 * २१ नोव्हेंबर २०२६ पासून लागू केलेली दूध दरवाढ तातडीने रद्द करावी किंवा प्रतिलिटर ६ व ४ रुपये केलेली वाढ कमी करावी.
 * दरवाढीमागील आर्थिक कारणे, उत्पादन खर्च आणि दरवाढीचे निकष ग्राहकांसमोर पारदर्शकपणे मांडावेत.
 * गोकुळच्या संचालक मंडळाने तातडीने बैठक घेऊन या दरवाढीचा पुनर्विचार करावा.

दरवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा विचार करावा लागेल, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes