SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघामार्फत म्हशीच्या दुधाला ३ रुपये आणि गाईच्या दुधाला २ रुपये दरवाढ दिल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी मानले संचालकांचे आभारबेसमेंटमधील पाणी ड्रेनेज लाईनमध्ये सोडल्याप्रकरणी वरद डेव्हलपर्सला १० हजारांचा दंडउंबरमाळी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ उत्साहातकार्तिक शुद्ध एकादशी निमित्त निघालेल्या पालखी सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग, वारकऱ्यांसमवेत भक्तीरसात तल्लीनसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. रईसा मुल्ला यांना पीएच.डी. पदवी प्रदानअब्दुललाटच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५८२ नागरिकांची तपासणीगोकुळची दूध दरवाढ तातडीने रद्द करा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन; प्रांत उपभोक्ता संरक्षण परिषद समितीच्या पूनमताई तोडकर यांचा इशारागोरगरिबांच्या आशीर्वादाने माझी नोका पैलतीराला लागेल; मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गारकोल्हापूर शहरातील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या चार आस्थापना सील

जाहिरात

 

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ उत्साहात

schedule21 Nov 26 person by visibility 187 categoryशैक्षणिक

 अतिग्रे : संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई डे बोर्डिंग स्कुलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. संजय घोडावत स्टेडियमवर शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूरचे डीवायएसपी  अमोल ठाकूर उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती उपस्थित होत्या. सीबीएसई डे बोर्डिंगच्या प्राचार्य अस्कर अली यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रीडाध्वज पुजन, ज्योत प्रज्वलन व संचलनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व विविध खेळांचे उत्कृष्ट संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. शाळेमध्ये शिकवले जाणारे बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तायकांदो, जिम्नॅस्टिक, हॉर्स रायडिंग  या सर्व खेळांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानंतर विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले. 100 मीटर 200 मीटर 400 मीटर 600 मीटर, 800मीटर धावणे, रिले, गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी यांसारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सर्व स्पर्धा अग्नी, त्रिशूल, पृथ्वी, आकाश या हाऊसमध्ये विभागलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पार पडल्या. 

याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे श्री. अमोल ठाकूर म्हणाले, " अंगावरील खेळाडूंनी घातलेली जर्सी किंवा अधिकाऱ्याने घातलेला एक युनिफॉर्म आपल्यामधील एक शिस्त व एक आत्मविश्वास निर्माण करत असतो. खेळामुळे शिस्त, सांघिक भावना, जिद्द आणि आत्मविश्वास वाढतो.अभ्यासाबरोबरच खेळही तितकाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्तीने जीवनात यश मिळवावे."

 संचालिका सस्मिता मोहंती यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, "संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. क्रीडा महोत्सवातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो." संस्थापक संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनीही क्रीडा महोत्सव कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच एम नवीन, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे यावेळी उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या शेवटी विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes