कोल्हापूर शहरातील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या चार आस्थापना सील
schedule21 Nov 26 person by visibility 211 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परवाना विभाग व उपद्रव शोध पथकाच्या संयुक्त पथकाने स्टेशन रोड, पाटणकर गल्ली, बसंत बहार रोड व ताराबाई पार्क या परिसरात कारवाई करत विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या चार व्यावसायिक आस्थापना सील करण्यात आल्या. यामध्ये वैभव ट्रव्हर्ल्स, मोहम्मद कुशन व सोफा तयार करणे, अमीरी सलुन व जोती क्लासेस या व्यवसायांचा समावेश आहे.
संबंधित आस्थापनांना नवीन व्यवसाय परवाना घेणे तसेच भाडेकरार सादर करण्याबाबत यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित व्यावसायिकांनी नोटिसांनंतरही कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे महापालिकेच्या संयुक्त पथकाने सीलबंद करण्याची कारवाई केली.
ही कारवाई आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या निर्देशानुसार उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये अधीक्षक अर्चना प्रभावळे, परवाना निरिक्षक आकाश मेंडके व उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सहभाग घेतला.
शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपल्याकडील करांची रक्कम तातडीने भरून आवश्यक परवाने व भाडेकराराची पूर्तता करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.