SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेदुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसलेक लाडकी योजनेचा लाभ आता अधिक सुलभ : लेक लाडकी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार : आदिती तटकरे महाराष्ट्र पोलीस दलाची पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम यशस्वीराष्ट्रीय विनोद दिन: हसण्याचे महत्त्व आणि आनंदोत्सवभाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात निरोगी महाराष्ट्र - सुदृढ महाराष्ट्रसाठी कार्य करणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरस्वातंत्र्य दिनानिमित्त सर्किट बेंच येथे ध्वजारोहण समारंभ महा-पल्स एआय आणि ‘आशा साथी’मुळे कोल्हापूरच्या आरोग्य व्यवस्थेला डिजिटल बळकटी : पालकमंत्री कोल्हापूर: सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन

जाहिरात

 

महाराष्ट्र पोलीस दलाची पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम यशस्वी

schedule16 Aug 26 person by visibility 122 categoryसामाजिक

कोल्हापूर : महाराष्ट्र पोलीस दलाने ऐतिहासिक वारसा जपत आणि वीरांच्या शौर्याची प्रेरणा घेत 'पन्हाळगड ते विशाळगड' ही ६५ किमीची पदभ्रमंती मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. १४ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत १५० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, वीरांच्या शौर्याची परंपरा आणि त्यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना व्हावी, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. याद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये साहसी वृत्ती निर्माण करून त्यांची शारीरिक व मानसिक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या मोहिमेची सुरुवात १४ ऑगस्ट रोजी पन्हाळगड येथील नरवीर बाजीप्रभू देशपांडे चौकातून झाली. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत मोहिमेला प्रारंभ झाला. पदभ्रमंती कुंभारवाडी, मांडलाईवाडी, करपेवाडी, पाटेवाडी फाटा, म्हालसवडे, धनगरवाडा आणि पावनखिंड मार्गे जात १५ ऑगस्ट रोजी विशाळगडच्या मुंडा दरवाजा येथे पोहोचली.

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ३० महिला पोलीस अंमलदारांसह एकूण १५० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. ऐतिहासिक पावनखिंड संग्राम, शौर्याच्या कथा आणि गड-किल्ल्यांचा इतिहास यांची उजळणी करत ही मोहीम यशस्वीरीत्या संपन्न झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes