SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेदुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसलेक लाडकी योजनेचा लाभ आता अधिक सुलभ : लेक लाडकी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार : आदिती तटकरे महाराष्ट्र पोलीस दलाची पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम यशस्वीराष्ट्रीय विनोद दिन: हसण्याचे महत्त्व आणि आनंदोत्सवभाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात निरोगी महाराष्ट्र - सुदृढ महाराष्ट्रसाठी कार्य करणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरस्वातंत्र्य दिनानिमित्त सर्किट बेंच येथे ध्वजारोहण समारंभ महा-पल्स एआय आणि ‘आशा साथी’मुळे कोल्हापूरच्या आरोग्य व्यवस्थेला डिजिटल बळकटी : पालकमंत्री कोल्हापूर: सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन

जाहिरात

 

भाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

schedule15 Aug 26 person by visibility 276 categoryराज्य

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
भाजपा जिल्हा कार्यालयात सकाळी ८ वाजता गुजरात येथे आयोजित पहिल्या विश्व योगासन चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक मिळविणारे रोहित दीपकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘वंदे मातरम्’ व राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

याप्रसंगी योगासन क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या रोहित दीपकराव चव्हाण यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी प्रदेश सचिव महेश जाधव, ॲड. संपतराव पवार, अमर साठे, गणेश देसाई, डॉ. राजवर्धन, संदीप देसाई, भरत काळे, दिलीप मेत्राणी, माधुरी नकाते, गायत्री राऊत, रीमा पालनकर, माधवी पाटील, उमा पवार, प्रवीणचंद्र शिंदे, अशोक लोहार, मामा कोळवणकर, सयाजी आळवेकर, राजेश कोगनुळकर, प्रदीप उलपे, सुनीलसिंह चव्हाण, देविदास अवताडे, महेश यादव, अमोल पालोजी, संदीप कुंभार, आप्पा लाड, सचिन सुराणा, झुंबरलाल गांधी, विश्वजीत पवार, भूषण कानकेकर, अनिकेत अतिग्रे, किरण कुलकर्णी, प्रशांत अवघडे, सुनीता सूर्यवंशी, विशाला कल्याणशेट्टी, संगीता काटकर, देवयानी पाटील, विद्या बनसोडे, श्रद्धा कुलकर्णी, अलका जावीर, अश्विनी वास्कर, शुभांगी चितारी, अरविंद वडगावकर, सुधीर देसाई, नजीर देसाई, तौफिक बागवान, अनिल कामत, दिलीप बोंद्रे, सुरेश गुजर, सचिन पवार, विश्वास पवार, शाहरुख गडवाले, नितीन पवार, प्रसाद पाटोळे, विवेक कोरडे, ईश्वरा पाटील, अशोक रामचंदानी यांच्यासह भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes