SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुली आहेत म्हणून थेट गर्भपात! कोल्हापुरात डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्या 'प्रतिमा हॉस्पिटल'वर पोलिसांचा दणका; २०० ते २५० अवैध गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली!प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा होणे आवश्यक : जिल्हाधिकारीज्ञानज्योती शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त विविध माध्यमिक विद्यालयांमध्ये वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटपकेएमटीच्या ताफ्यात पहिल्या तीन वातानुकूलित ई-बसेस दाखल; लवकरच नियमित सेवेत : सभापती सत्यजित जाधवमहिलांनी निर्भयपणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा : पोलीस उपनिरीक्षक मयूश्वरी खरात; डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यानराधानगरी भरले 99.51 टक्के; कोल्हापूर जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखालीकोल्हापूर जिल्ह्यात 12 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागूएक थरार....बालंबाल बचावलो.. .डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा ‘बेस्ट इन्स्टिट्यूट’ पुरस्काराने सन्मान; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते गौरव स्वमान सोशल मानवाधिकार परिषद संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नारायण पोवार यांचा सत्कार

जाहिरात

 

कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्या वतीने “वेल्थ कॉन” चे आयोजन

schedule30 Jul 26 person by visibility 214 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्या वतीने 'वेल्थ कॉन २०२६' या मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक १ ऑगस्ट रोजी इचलकरंजी येथे आणि रविवार दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता कोल्हापुरात हॉटेल पॅव्हेलियन येथे हे मार्गदर्शनपर चर्चासत्र होणार आहे.

यामध्ये व्यवसायाच्या 'चांगल्याकडून उत्कृष्टकडे' (good to great) म्हणजेच G २ G जाण्याच्या टप्प्यावर गुंतवणूक कशी करावी या विषयावर एडलवाईस कंपनीचे अध्यक्ष आणि मॅंगो टाऊनचे सह संस्थापक अजय शर्मा हे पहिल्या सत्रात मार्गदर्शन करतील. आणि दुसऱ्या सत्रात मिराए ॲसेट शेअरखान (Mirae Asset Sharekhan) येथे रिटेल रिसर्च प्रमुख सोमिल मेहता हे व्यवसायातील "अस्थिरतेपलीकडील संधी" या विषयावर मार्गदर्शन करतील. अशी माहिती कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण ओसवाल आणि सचिव मनीष झंवर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोल्हापूर देखील उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने झपाट्याने वाढत आहे. त्यात आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीचे नवनवीन पर्याय समोर उभे राहत आहेत. ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होत आहे. पारंपरिक गुंतवणुकीकडून लोकांचा कल हा आधुनिक गुंतवणुकीकडे वाढलेला आहे. यामध्ये लघु आणि मध्यम उद्योग व्यवसायात गुंतवणूक करण्याकडे लोक वळत आहेत. यामध्ये गुंतवणूक फार महत्त्वाची कामगिरी बजावते. याबद्दल व्यावसायिक तसेच एकल व्यापारी आणि इतरांना देखील याचा फायदा व्हावा याकरिता अशा प्रकारच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. असे असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण ओसवाल यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस सचिव मनीष झंवर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes