SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर हादरले: शिंगणापुरात नदीत बुडून ४ वर्षीय चिमुल्याचा दुर्दैवी मृत्यूफ्लिपकार्टमध्ये डीकेटीईच्या एमबीएच्या पंधरा विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवडशाहू विचारांचे भाष्यकार ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना (मरणोपरांत) ४० वा 'राजर्षी शाहू पुरस्कार' जाहीरड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार:पालकमंत्री हसन मुश्रीफकोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरूखेत बचाव अभियान अंतर्गत कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षणखरीप हंगामासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देशकोल्हापुरात मोफत 'वॉटर रेस्क्यू' प्रशिक्षण: दिनकर कांबळे यांचा पुढाकारकोल्हापुरात 'इनर व्हील क्लब'तर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बसथांब्याचे लोकार्पणसुवर्णतुला: हिंदवी स्वराज्याच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात

जाहिरात

 

कोल्हापुरात 'इनर व्हील क्लब'तर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बसथांब्याचे लोकार्पण

schedule04 Jun 26 person by visibility 139 categoryसामाजिक

कोल्हापूर: इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर आपल्या सुवर्णमहोत्सवी 'स्वर्ण आभा' वर्षाचे औचित्य साधून कोल्हापूर शहरातील नागरिकांसाठी एका महत्त्वपूर्ण समाजोपयोगी प्रकल्पाची भेट देत आहे. या उपक्रमांतर्गत कोल्हापूर शहरातील 'सोन्या मारुती चौक' येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक सार्वजनिक बसथांब्याचे लोकार्पण सोहळा सोमवार, दिनांक ९ जून  रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हा लोकार्पण सोहळा इंटरनॅशनल इनर व्हीलच्या खजिनदार डॉ. रश्मी शर्मा यांच्या हस्ते संपन्न होणार असून, कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रूपाराणी निकम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, तसेच राज्य परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन आणि महानगरपालिका प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गेल्या ५० वर्षांपासून इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासात मोलाची भर घालणारा हा बसथांबा प्रकल्प क्लबच्या सेवाभावी कार्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या सर्व सदस्यांनी  उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे.

यावेळी ​इव्हेंट चेअरमन:  रुपाली बाड, ​इव्हेंट सेक्रेटरी: डॉ. विद्या पठाडे, ​पी.ए.टी. (PAT): डॉ. विद्युत शाह, 
​प्रोजेक्ट चेअरमन: पी.पी. दीपा जाधव, ​क्लब प्रेसिडेंट:  रुक्मिणी हेगिशते, ​क्लब सेक्रेटरी:  स्मिता घोसाळकर आधी पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes