राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पूर्व प्राथमिक शाळांचे महत्व
schedule17 Apr 25 person by visibility 508 categoryशैक्षणिक

डॉ. के. कस्तुरीरंगन आयोगाने मनुष्यबळ विकास मंत्रालयास सादर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०१९ या अहवालावर बेतलेले 'राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२०,' २९ जुलै, २०२० मध्ये लागू करण्यात आले. हे धोरण शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, विचार करण्यासारखे इतर महत्त्वाचे केंद्रीय मुद्दे आणि अंमलबजावणी अशा चार भागांत विभागलेले आहे. हे धोरण देशाच्या शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करणारे असून, ते २०४० पर्यंत पूर्णपणे अमलात आणले जाणार आहे. प्रचलित शिक्षण व्यवस्थेत खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे या धोरणात निश्चित केले आहे. शालेय शिक्षणाचे १०+२+३ हे प्रारूप बदलून त्याऐवजी ५+३+३+४ हे प्रारूप स्वीकारले आहे. अभ्यासक्रम, व्यवस्थापन, अध्ययन-अध्यापन, मूल्यांकन, शिक्षणाचे नियमन आणि संस्थात्मक मूल्यमापन आणि मूल्यांकन यात बदल सुचवले आहेत. उच्च शिक्षणाची प्रचलित संस्थात्मक रचनाच हे शिक्षण धोरण पूर्णार्थाने नाकारते. बहुशाखीय शिक्षण पद्धतीचा स्वीकार, संशोधनास प्राधान्य, उच्च शिक्षण नियामक संस्थांची पुनर्रचना ही या धोरणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये. प्रेरित, उत्साही आणि सक्षम शिक्षक शिक्षणातील महत्त्वाचा घटक असतो याची दखलही या धोरणात घेतली आहे.
'राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०१९' हा आराखडा, तसेच 'राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२०' सर्वांनीच पूर्णतः वाचले असेल असे नाही. ज्यांना काही कारणामुळे असे वाचन करता आले नसेल अशा वाचकांना राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मधील सर्व महत्त्वाच्या तरतुदी लक्षात याव्यात यासाठी या प्रकरणात 'राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२०' मधील महत्त्वाचा भाग उद्धृत केलेला आहे.
▪️धोरणाचे मूलभूत गाभा घटक :
शालेय शिक्षण
प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण अध्ययनाचा पाया,
पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अध्ययनासाठी एक तातडीची आणि आवश्यक पूर्वअट
शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करणे आणि शिक्षण सर्वत्र आणि सगळया स्तरांवर पोहोचेल, हे सुनिश्चित करणे
▪️शाळांमधील अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र : शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायी आणि रंजक असले पाहिजे
▪️शिक्षक :
यथायोग्य आणि सर्वसमावेशक शिक्षण : सर्वांसाठी शिक्षण
शाळा संकुल / क्लस्टरच्या माध्यमातून कार्यक्षम संसाधन आणि प्रभावी व्यवस्थापन
शालेय शिक्षणासाठी मानक ठरवणे आणि अधिस्वीकृती
▪️उच्च शिक्षण :
दर्जेदार विद्यापीठे आणि महाविद्यालये : भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेसाठी नवीन आणि भविष्योन्मुखी दृष्टिकोन संस्थांची पुनर्रचना आणि बळकटीकरण
अधिक सर्वांगीण आणि बहुशाखीय शिक्षणाच्या दिशेने या शिक्षण व्यवस्थेचा हेतू तार्किक विचार आणि कृती करण्यासाठी सक्षम असलेल्या आणि (सहृदयता) करुणा, सहानुभूती, धैर्य आणि चिकाटी, विज्ञानाधिष्ठित कल व रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक बांधीलकी आणि मूल्ये असलेल्या चांगल्या व्यक्ती विकसित करणे असा आहे. याचा उद्देश आपल्या घटनेद्वारे परिकल्पित न्याय्य, सर्वसमावेशक आणि बहुलतावादी समाजाच्या निर्मितीत सहभाग घेणारे, कार्यक्षम आणि चांगल्या प्रकारे योगदान देणारे नागरिक तयार करणे, असा आहे.
सर्वसाधारणपणे शिक्षणव्यवस्था आणि त्याबरोबरच स्वतंत्र संस्था, या दोन्हींना मार्गदर्शन करणारे मूलभूत सिद्धान्त असे आहेत :
प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे शिक्षक आणि पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास आणि अभ्यासेतर, दोन्ही क्षेत्रांमध्ये चालना देणे.
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या गोष्टींना इयत्ता ३री पर्यंत सर्वोच्च प्राधान्य देणे. लवचिकता असावी; म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनाचा मार्ग आणि कार्यक्रम निवडण्याची मुभा असेल आणि ते आपली प्रतिभा आणि आवड यानुसार आयुष्यात आपला मार्ग निवडू शकतील.
कला आणि विज्ञान, अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रम, व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रवाह यांच्यामध्ये कोणतेही स्पष्ट विभाजन नसले पाहिजे; म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रांमधील हानिकारक उच्च-नीचता आणि त्यांच्यात पडलेले अंतर दूर होईल. सगळ्या ज्ञानाची एकता आणि अखंडता सुनिश्चित करून एका बहुआयामी जगासाठी विज्ञान, समाजशास्त्र, कला, मानव्यशास्त्रे आणि खेळ यांच्यामध्ये शिक्षणाचा विकास.
बहु-शाखीय (multi - disciplinary) आणि समग्र घोकंपट्टीऐवजी किंवा परीक्षेसाठी शिकण्याऐवजी संकल्पना समजून घेण्यावर भर तर्कशुद्ध निर्णय घेण्यासाठी आणि नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी कल्पकता आणि तार्किक विचार नैतिकता आणि मानवी व घटनात्मक मूल्ये, उदा. सहृदयता, इतरांबद्दल
आदर, स्वच्छता, सौजन्य, लोकशाहीची जाणीव, सेवेची भावना, सार्वजनिक मालमत्तेबद्दल आदर, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्य, जबाबदारी, बहुलतावाद, समता आणि न्याय अध्यापनात आणि अध्ययनात बहु-भाषिकत्व आणि भाषा शक्ती यांना प्रोत्साहन,संवाद, सहकार्य, सामूहिक कार्य आणि लवचिकता अशी जीवनमूल्ये वर्षाच्या शेवटी परीक्षेला केंद्रस्थानी ठेवून होणाऱ्या मूल्यांकनामुळे 'सध्याच्या कोचिंग संस्कृती'ला महत्त्व आले आहे, त्याऐवजी शिकण्यासाठी सातत्यपूर्ण मूल्यांकनावर भर
अध्यापनात आणि अध्ययनात तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर, भाषेचे अडथळे काढून टाकणे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभ बनवण्यासाठी शैक्षणिक नियोजन आणि व्यवस्थापन
शिक्षण व्यवस्थेत सर्व विद्यार्थ्यांना प्रगती करता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सर्व शैक्षणिक निर्णयांमध्ये पूर्ण समानता आणि सर्वसमावेशकता ही पायाभूत गोष्ट प्रारंभिक बाल्यावस्थेतील संगोपन आणि शिक्षणापासून ते शालेय शिक्षण ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व पातळ्यांवरील शिक्षणाच्या अभ्यासक्रमात सुसूत्रता शिक्षक आणि प्राध्यापक हे शिक्षण प्रक्रियेचे केंद्र मानणे त्यांची भरती आणि तयारीची उत्कृष्ट व्यवस्था, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास आणि कामकाजाचे वातावरण व सेवेची स्थिती सकारात्मक असणे.
शिक्षण प्रणालीची अखंडता, पारदर्शकता आणि संसाधनांची कार्यक्षमता ऑडिट आणि सार्वजनिक प्रकटीकरणाच्या माध्यमातून सुनिश्चित करण्यासाठी एक 'सुलभ पण परिणामकारक' नियमांची चौकट देणे. त्याबरोबरच स्वायत्तता, सुशासन आणि सशक्तीकरणाच्या माध्यमातून नावीन्यपूर्णता आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहित करणे
गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विकासासाठी आवश्यकता म्हणून उत्कृष्ट दर्जाचे संशोधन शिक्षण तज्ज्ञांद्वारे सातत्यपूर्ण संशोधन आणि नियमित मूल्यांकनाद्वारे प्रगतीचा सातत्यपूर्ण आढावा
आपल्या भारतीय मुळांचा, भारताचा आणि भारताच्या समृद्ध, वैविध्यपूर्ण, प्राचीन आणि आधुनिक संस्कृती जानव्यवस्था आणि परंपरा यांचा अभिमान असणे.
शिक्षण ही एक सार्वजनिक सेवा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध असणे हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क समजला पाहिजे.
सशक्त, जिवंत सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेत लक्षणीय गुंतवणूक, तसेच देणगीदार, खाजगी आणि सामुदायिक संस्थांच्या भागिदारीला प्रोत्साहन आणि सुविधा
धोरणाची दूरदृष्टी भारतीय असल्याचा सखोल अभिमान विद्यार्थ्यांच्या केवळ विचारांमध्येच नव्हे तर त्यांच्या व्यवहारात, बुद्धीमध्ये आणि कृतीमध्येदेखील रुजवणे, तसेच मानवी हक्क, शाश्वत विकास आणि जीवनमान यांच्याशी जबाबदारीपूर्ण बांधिलकीचे समर्थन करणारे ज्ञान, कौशल्ये, मूल्ये आणि स्वभाव विकसित करणे, जेणेकरून ते खऱ्या अर्थाने एक वैश्विक नागरिक बनतील, अशी या धोरणाची दूरदृष्टी आहे.
३-१८ वयोगटाला समाविष्ट करणारी ५+३+३+४ अशी नवीन अध्यापनशास्त्राची आणि अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे हा या धोरणाचा उद्देश आहे. नवीन ५+३+३+४ संरचनेत, वय वर्ष ३ पासून प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षणाचा (ECCE) मजबूत पायादेखील समाविष्ट केला आहे, ज्याचा उद्देश अधिक चांगले सर्वांगीण शिक्षण, विकास आणि हित यांना चालना देणे हा आहे.
१ .प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण: अध्ययनाचा पाया
लहान मुलांच्या मेंदूच्या एकंदर विकासापैकी ८५टक्क्यांहून अधिक विकास वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत होतो. सध्या कोट्यवधी लहान मुलांना, विशेषतः,सामाजिक-आर्थिकदृष्टया वंचित पार्श्वभूमी असलेल्या मुलांना दर्जेदार ECCE उपलब्ध नाही. गुणवत्तापूर्ण बाल्यावस्था पूर्व विकास, संगोपन आणि शिक्षणाची सार्वत्रिक तरतूद शक्य तितक्या लवकर आणि २०३० च्या आत होणे आवश्यक आहे. म्हणजे इयत्ता १ली मध्ये प्रवेश करणारे सर्व विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी सज्ज झालेले असतील.
ECCE चे एकंदर उद्दिष्ट पुढे उल्लेखलेल्या क्षेत्रांत चांगले परिणाम साध्य करणे असे आहे शारीरिक विकास, कृतिकौशल्यांचा विकास, आकलन विकास, सामाजिक-भावनिक-नैतिक विकास, सांस्कृतिक/कलात्मक विकास आणि संवाद व प्रारंभिक भाषा, साक्षरता आणि संख्याज्ञान यांचा विकास करणे.
भारतात हजारो वर्षांपासून विकसित झालेल्या अनेक समृद्ध स्थानिक परंपरांचादेखील यात योग्य प्रकारे समावेश केला जाईल, ज्यामध्ये कला, कथा, कविता, खेळ, गाणी आणि इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. हा आराखडा पालक आणि बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षण संस्था या दोहोंसाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल.
प्रारंभिक बाल्यावस्था शैक्षणिक संस्थांचा लक्षणीयरीत्या विस्तार आणि त्यांचे बळकटीकरण केलेल्या यंत्रणेद्वारे ECCE प्रदान केले जाईल, ज्यामध्ये (अ) स्वतंत्र अंगणवाड्या (ब) प्राथमिक शाळांसोबत असलेल्या अंगणवाड्या (क) विद्यमान प्राथमिक शाळांसोबत असलेल्या पूर्व प्राथमिक शाळा/विभाग ज्यामध्ये किमान ५-६ वर्षे हा वयोगट समाविष्ट असेल; आणि (ड) स्वतंत्र पूर्व प्राथमिक शाळा, यांचा समावेश असेल - या सर्वांमध्ये ECCEचा अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र यांचे विशेष प्रशिक्षण दिलेले कर्मचारी/शिक्षक भरती केले जातील.
ECCEच्या सार्वत्रिक उपलब्धतेसाठी, अंगणवाडी केंद्रांचे उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, खेळाचे साहित्य आणि प्रशिक्षित अंगणवाडी कर्मचारी/शिक्षक यांद्वारे सशक्तीकरण केले जाईल. शाळा संकुल/समूहांमध्ये अंगणवाडीचे पूर्णपणे एकात्मीकरण केले जाईल आणि अंगणवाडीतील मुले, पालक व शिक्षकांना शाळेच्या/शाळा संकुलाच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाईल. त्याचप्रमाणे शाळा संकुलेही अंगणवाडीकडे जातील.
असे संकल्पित आहे की, वय वर्षे ५च्या अगोदर प्रत्येक मूल 'पूर्वाध्ययन वर्ग' (प्रिपरेटरी वर्ग) किंवा 'बालवाडी' (म्हणजे इयत्ता पहिलीच्या आधी) येथे जाईल.
अंगणवाड्यांमध्ये उच्च दर्जाचा प्रारंभिक ECCE शिक्षकवर्ग तयार करण्यासाठी NCERने विकसित केलेल्या अभ्यासक्रम/शैक्षणिक आराखड्यानुसार पद्धतशीर प्रयत्नांतून सध्याच्या अंगणवाडी सेविका/शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. अंगणवाडी सेविकांच्या/शिक्षकांच्या ECCE प्रशिक्षणास शालेय शिक्षण
विभागाच्या क्लस्टर रिसोर्स सेंटरद्वारे मार्गदर्शन केले जाईल. आदिवासीबहुल भागांतील आश्रमशाळांमध्ये आणि टप्प्याटप्प्याने पर्यायी शिक्षणाच्या सर्व स्वरूपांमध्येदेखील ECCEची सुरुवात केली जाईल.
पूर्वप्राथमिक शाळेतून प्राथमिक शाळेत अभ्यासक्रमाचे सातत्य सुरक्षित करण्यासाठी आणि शिक्षणाच्या मूलभूत पैलूंकडे योग्य लक्ष दिले जाईल हे सुनिश्चित करण्यासाठी, ECCE अभ्यासक्रम आणि शैक्षणिक जबाबदारी.सध्या, ECCEची सार्वत्रिक उपलब्धता नसल्याने, इयत्ता १ली च्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुले मागे पडतात. त्यामुळे, सर्व मुले शाळेसाठी तयार असतील हे सुनिश्चित करण्यासाठी, मधल्या काळात इयत्ता १ली च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अक्षरे, ध्वनी, शब्द, रंग, आकार आणि संख्या शिकण्याशी संबंधित उपक्रम आणि कार्यपुस्तिकांचा समावेश असलेले, सहाध्यायी व पालकांच्या सहकार्याचा सहभाग असलेले, खेळांवर आधारित तीन महिन्यांचे एक 'शाळा तयारी मोड्युल', NCERT आणि SCERT विकसित करतील.
मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानावरील उच्च गुणवत्तेच्या संसाधनाचे एक राष्ट्रीय भांडार डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग (DIKSHA) वर उपलब्ध केले जाईल.
प्रशिक्षित शिक्षकांच्या देखरेखीखाली आणि सुरक्षेच्या पैलूंची काळजी घेऊन, सहाध्यायींकडून समोरासमोर बसून शिकणे हे ऐच्छिक आणि मजेदार उपक्रमाच्या स्वरूपात केले जाऊ शकते.सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक आणि प्रेरणादायक पुस्तके विकसित केली जातील आणि त्यांचा सर्व स्थानिक व भारतीय भाषांमध्ये (आवश्यकतेनुसार तांत्रिक साहाय्य घेऊन) उच्च गुणवत्ता असणारा अनुवाद केला जाईल. ही पुस्तके शालेय आणि स्थानिक सार्वजनिक वाचनालयांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येतील. देशभरात वाचनसंस्कृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आणि शालेय वाचनालयांचा लक्षणीयरीत्या विस्तार केला जाईल. डिजिटल वाचनालयेदेखील स्थापन केली जातील, विशेषतः, गावांमध्ये, ज्यांचा उपयोग शाळेनंतरच्या वेळेनंतरच्या वेळेत आसपासचे लोकदेखील घेऊ शकतील. वाचन मोठ्या प्रमाणावर सुलभकरण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी सार्वजनिक वा शालेय वाचनालयांमध्ये 'बुक क्लब' बैठकी घेऊ शकतात.
पौष्टिक जेवण आणि प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक आणि समुदायाचा सहभाग यांचा शालेय व्यवस्थेमध्ये समावेश करून मुलांची पोषण आणि आरोग्यविषयक (मानसिक आरोग्यासह) समस्या सोडवली जाईल. शिवाय, संशोधनात असे आढळून आले आहे की, पौष्टिक नाष्ट्यानंतरचे सकाळचे काही तास अधिक आकलनक्षमतेची गरज असलेल्या अवघड विषयांच्या अभ्यासासाठी उत्तम असतात आणि म्हणूनच दुपारच्या जेवणाव्यतिरिक्त एक साधा पण पौष्टिक नाष्टा देऊन या तासांचा फायदा करून घेता येऊ शकतो. सर्व शालेय विद्यार्थ्यांची, विशेषतः,
४.शाळांमधील अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र : शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असावे.
शालेय अभ्यासक्रम आणि अध्यापनाची ५+३+३+४ या नवीन मांडणीत पुनर्रचना करणे.
शिक्षणासाठीचा अभ्यासक्रम आराखडा हे ५+३+३+४ रचनेनुसार असतील, ज्यामध्ये पायाभूत स्तर (दोन भागांमध्ये, म्हणजे अंगणवाडी/पूर्वप्राथमिक शाळेची ३ वर्षे प्राथमिक शाळेतील इयत्ता १ली २रीची दोन वर्षे, (एकत्रितपणे दोन्हीमध्ये ३-८ वयोगट समाविष्ट), पूर्वाध्ययन (प्रिपरेटरी) स्तर (इयत्ता ३री-५वी, ८-११ वयोगट समाविष्ट), पूर्वमाध्यमिक स्तर (इयत्ता ६वी-८वी, ११-१४ वयोगट समाविष्ट) आणि माध्यमिक स्तर (इयत्ता ९वी-१२वी, दोन टप्प्यांत म्हणजे ९वी आणि १०वी पहिल्या आणि ११वी आणि १२वी दुसऱ्या, १४-१८ वयोगट समाविष्ट) यांचा समावेश असेल.
पायाभूत स्तरामध्ये पाच वर्षांचे लवचिक, बहुस्तरीय, खेळ/उपक्रम ECCEचा अभ्यासक्रम व अध्यापन समाविष्ट असेल. पूर्वाध्ययन स्तरामध्ये पायाभूत स्तरातील खेळ, शोध आणि उपक्रमावर आधारित अध्ययन आणि अभ्यासक्रमाच्या शैलीवर विकसित तीन वर्षांचे शिक्षण असेल. काही सोपा मजकूर असलेल्या पुस्तकांचा, तसेच अधिक औपचारिक, परंतु संवादात्मक पद्धतीने वर्गात शिकण्याच्या बाबींचादेखील समावेश करण्यास सुरुवात केली जाईल, जेणेकरून वाचन, लेखन, बोलणे, शारीरिक शिक्षण, कला, भाषा, विज्ञान आणि गणित यांसारख्या विषयांचा पाया भक्कम होईल. पूर्वमाध्यमिक स्तरामध्ये, पूर्वाध्ययन स्तराच्या अध्ययन आणि अभ्यासक्रमाच्या शैलीवर पुढे विकसित केलेले तीन वर्षांचे शिक्षण असेल; मात्र प्रत्येक विषयातील अधिक अमूर्त संकल्पना शिकण्यासाठी आणि त्याविषयी चर्चेसाठी विषय शिक्षकांची सुरुवात झाल्यावर विद्यार्थी या टप्प्यावर विज्ञान, गणित, कला, सामाजिक शास्त्रे आणि मानव्यशास्त्रासाठी सज्ज असतील. अधिक विशिष्ट विषयांची आणि विषय शिक्षकांची ओळख करून दिली असली तरीही प्रत्येक विषयामधील कार्यात्मक शिक्षणास आणि वेगवेगळ्या विषयांमधील संबंध शोधण्यास प्रोत्साहन आणि विशेष महत्त्व दिले जाईल. माध्यमिक स्तरामध्ये चार वर्षांचा बहुशाखीय अभ्यास समाविष्ट असेल, जो पूर्वमाध्यमिक स्तरातील विषयाभिमुख अध्ययन आणि अभ्यासक्रम शैलीवर पुढे विकसित केला असेल; परंतु त्यात अधिक सखोलता, अधिक चिकित्सक विचार, आयुष्यातील इच्छा-आकांक्षांकडे अधिक लक्ष देणे आणि अधिक लवचिकता व विद्यार्थ्यांना विषयांची निवड करता येणे, या बाबी समाविष्ट असतील. विशेषतः, विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी नंतर शिक्षण सोडण्याचा आणि इयत्ता ११-१२वी मधील व्यावसायिक किंवा इतर कोणतेही अभ्यासक्रम करण्यासाठी पुढच्या स्तरामध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. इच्छा असल्यास अधिक विशेषीकृत शाळेतदेखील प्रवेश घेता येईल.
▪️विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास :
सर्व स्तरांवरील अभ्यासक्रम आणि अध्यापनातील सुधारणांचा एकंदर मुख्य भर असेल तो म्हणजे खरोखर समज वाढवण्याच्या आणि कसे शिकायचे ते शिकण्याच्या दिशेने व सध्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असलेल्या पाठांतर संस्कृतीच्या (घोकंपट्टीच्या) शिक्षणापासून शिक्षण व्यवस्थेला दूर नेणे यांवर असेल.
आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारशक्ती वाढविण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे.
अभ्यासक्रमातील मजकूर कमी करून प्रत्येक विषयातील अत्यावश्यक घटक राखले जातील, जेणेकरून चिकित्सक विचार आणि अधिक समग्र, प्रश्नाधारित, संवाद आधारित आणि विश्लेषण आधारित शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जाईल. अनिवार्य मजकूर हा प्रमुख संकल्पना, कल्पनाशक्ती, उपयोजन आणि समस्या सोडवणे यावर लक्ष केंद्रित करेल.
▪️अनुभवात्मक शिक्षण
सर्व स्तरांवर, अनुभवात्मक शिक्षणाचा अवलंब केला जाईल.
कला-एकात्मीकरण हे एक बहुअध्यासक्रमीय अध्यापन दृष्टिकोन आहे ज्यामध्ये विविध विषयांच्या संकल्पना शिकण्यासाठी आधार म्हणून कला आणि संस्कृतीच्या विविध पैलूंचा आणि प्रकारांचा उपयोग केला जातो. प्रत्येक स्तरावर अध्यापन व शिक्षण प्रक्रियेत भारतीय कला आणि संस्कृती एकत्रित करून भारतीय संस्कार बिंबवण्यासाठी, कलासक्त (कला अंतर्भूत केलेले) शिक्षण वर्गातील व्यवहारांमध्ये समाविष्ट केले जाईल.
क्रीडा-एकात्मीकरण हा आणखी एक बहु-अभ्यासक्रमीय अध्यापन दृष्टिकोन आहे. विद्यार्थ्यांनी तंदुरुस्ती / फिटनेस हा आयुष्यभराचा दृष्टिकोन म्हणून अंगीकारण्यासाठी आणि 'फिट इंडिया' चळवळीत अभिप्रेत असलेल्या फिटनेसच्या पातळीसह, फिटनेसशी संबंधित जीवनकौशल्ये साध्य करण्यासाठी क्रीडा-एकात्मिक शिक्षण वर्गातील व्यवहारांमध्ये समाविष्ट केले जाईल.
▪️बालवाडी शिक्षण :
लहान मुलाच्या मेंदूच्या एकंदर विकासापैकी 85% हून अधिक विकास वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत होतो. गुणवत्तापूर्ण बाल्यावस्था पूर्व विकास, संगोपन आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिक तरतुदीमुळे ही मुले आयुष्यभर शैक्षणिक व्यवस्थेत सहभाग घेण्यास आणि उत्कर्ष साधण्यास सक्षम बनतील. बालशिक्षणासाठी लवचिक, बहुपैलू, बहुस्तरीय, खेळांवर आधारित, कृती आधारित आणि जिज्ञासा आधारित शिक्षणाचा समावेश असावा. ज्यामध्ये अक्षरे, भाषा, संख्या मोजणे, रंग, आकार, घरातील आणि मैदानी खेळ, कोडी आणि तार्किक विचार, समस्या सोडवणे, चित्रकला, रंगवणे आणि इतर दृश्य कला, हस्तकला, नाटक आणि बोलक्या बाहुल्या, संगीत आणि हालचाली यांचा समावेश असावा. यात सामाजिक क्षमता, संवेदनशीलता, चांगली वर्तणूक, सौजन्य, नैतिकता, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता, सांघिक कार्य आणि सहकार्य यांचा विकास करण्यावरदेखील लक्ष केंद्रित केले जावे.
वय वर्ष ५ च्या अगोदर प्रत्येक मुलाने “पूर्व अध्ययन वर्ग (प्रिपरेटरी वर्ग) किंवा “बालवाडी” मध्ये अपेक्षित असलेली मूलभूत कौशल्ये आत्मसात केलेली असावीत. पूर्वाध्ययन वर्गातील शिकणे हे प्रामुख्याने खेळांवर आधारित असेल. जे आकलनात्मक, भावनात्मक, सायकोमोटर क्षमता, पूर्व साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करणे यावर आधारित असावे. वाचन, लेखन आणि संख्यांच्या मूलभूत क्रिया करता येणे ही भविष्यातील सर्व शालेय शिक्षणासाठी आणि निरंतर अध्ययनासाठी एक अनिवार्य पूर्वअट आहे. मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान, वाचन, लेखन, बोलणे, मोजणे, अंकगणित, गणितीय विचार यावर पूर्व अध्ययन वर्गात भर असावा.
मनोरंजक आणि प्रेरणादायक पुस्तके, उपक्रमासाठी राखीव तास, वर्षभर नियमित कार्यक्रम, अनुभवात्मक, सर्वसमावेशक, एकात्मिक, लवचिक, जिज्ञासू, संशोधन केंद्रित, सहाध्यायीकडून समोरासमोर बसून शिकणे अशा ऐच्छिक आणि मजेदार अशा उपक्रमांचा समावेश केला जावा. सर्व स्तरांवर, अनुभवात्मक शिक्षणाचा अवलंब केला जावा. ज्यात प्रत्येक विषयामध्ये प्रात्यक्षिक शिक्षण, कला आणि खेळ यांचा समावेश असावा. शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असावे.
प्रत्येक स्तरावर अध्यापनात व शिक्षण प्रक्रियेत भारतीय कला आणि संस्कृती एकत्रित करुन भारतीय संस्कार बिंबवण्यासाठी कलासक्त शिक्षण वर्गातील व्यवहारामध्ये समाविष्ट केले जावे. स्थानिक खेळासह शारीरिक उपक्रमांचा वापर अध्यापन पद्धतीमध्ये करुन सहकार्य, स्वयं-पुढाकार, स्वत:ची दिशा, स्वयंशिस्त, सांघिक कार्य, जबाबदारी, नागरिकत्व इ. कौशल्ये साध्य करण्यासाठी क्रीडा-एकात्मिक शिक्षण वर्गातील व्यवहारामध्ये समाविष्ट केले जावे.
किमान चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षणाचे माध्यम मातृभाषा, स्थानिक/प्रादेशिक भाषा असले पाहिजे. एखादी भाषा शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी ती शिक्षणाचे माध्यम असणे आवश्यक नाही. २ ते ८ वर्षे या वयात मुले भाषा अतिशय लवकर शिकतात. त्यामुळे पायाभूत पायरीपासूनच मुलांना सुरुवातीलाच विविध भाषांची ओळख करून दिली जावी पण मातृभाषेवर विशिष्ट भर असावा.
बालवाडीचा इतिहास
तुम्हाला कधी विचार आला आहे का की आपल्याला बालवाडी कशी मिळाली? हे सहसा मुलाच्या शैक्षणिक कारकिर्दीचे पहिले वर्ष असते, तरीही त्याला प्रथम श्रेणी म्हटले जात नाही. का?
अमेरिकेतील शिक्षण प्रणालीची ग्रेड लेव्हल प्रणाली बालवाडी शैक्षणिक क्षेत्रात येण्यापूर्वीच तयार झाली होती. बालवाडी , एक प्रारंभिक शिक्षण शालेय तयारी कार्यक्रम, जर्मनीतून आला होता आणि १८५६ मध्ये विस्कॉन्सिनमधील वॉटरटाउन येथे मार्गारेथे शुर्झ यांनी अमेरिकेत प्रथम सादर केला होता. १९८० च्या दशकापर्यंत बालवाडी ही संरचित शैक्षणिक वर्ग बनली नव्हती ज्यांचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या शैक्षणिक गरजांसाठी तयार करणे होता.
बालवाडीतील मुलांचे वय किती असते?
बालवाडीतील मुले पाच ते सहा वर्षांच्या दरम्यान असतात आणि प्रत्येक शाळा जिल्ह्यात एक विशिष्ट अंतिम तारीख असते जी मुलाने पाच वर्षांचे असणे आवश्यक आहे. ही अंतिम मुदत सहसा १ जुलै ते १ सप्टेंबर दरम्यान असते.
▪️बालवाडीत जाणाऱ्या मुलाला तुम्ही काय म्हणता?
बालवाडीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला बालवाडी म्हणतात. बालवाडी हा शब्द "मुलांची बाग" या जर्मन शब्दापासून आला आहे.
▪️बालवाडीसाठी कोणते धडे आहेत?
बालवाडी वर्गातील धड्यांमध्ये वाचन, लेखन, गणित, विज्ञान आणि सामाजिक अभ्यास यासारखे सर्व शैक्षणिक विषय समाविष्ट आहेत. त्यामध्ये सामाजिक आणि भावनिक कौशल्य निर्मिती देखील समाविष्ट आहे.
बालवाडीचा इतिहास
तुम्हाला कधी विचार आला आहे का की आपल्याला बालवाडी कशी मिळाली? हे सहसा मुलाच्या शैक्षणिक कारकिर्दीचे पहिले वर्ष असते, तरीही त्याला प्रथम श्रेणी म्हटले जात नाही. का?
पहिल्या इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी मुलाने बालवाडी कार्यक्रमात शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे, तर इतर राज्यांमध्ये, बालवाडी ही पहिली इयत्तेसाठी पूर्व-अट नाही.
सर्वसाधारणपणे, बालवाडीतील विद्यार्थ्यांनी गणित, कला, विज्ञान, भाषा कला, संगीत, लेखन, शारीरिक शिक्षण, सामाजिक अभ्यास आणि वाचन यासारख्या सामान्य शैक्षणिक कार्यक्रमाच्या सर्व पैलूंचा समावेश केला पाहिजे. शैक्षणिक विषयांव्यतिरिक्त, बालवाडीतील विद्यार्थी पहिली इयत्ता आणि त्यापुढील इयत्तेत यशस्वी संक्रमणासाठी आवश्यक असलेली सामाजिक कौशल्ये शिकतात. वळणे कशी घ्यावी, शांतपणे कसे बसावे, सूचनांचे पालन कसे करावे आणि दीर्घकाळ लक्ष कसे द्यावे यासारख्या गोष्टी बालवाडीत सक्रियपणे राबविल्या जातात.
▪️शालेय अभ्यासक्रम :
प्रचलित शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असलेल्या घोकंपट्टी संस्कृतीपासून शिक्षण व्यवस्थेस दूर नेण्यावर हे धोरण भर देते. शिक्षणाचा उद्देश चांगले व्यक्तिमत्त्व घडवणे हा असतो. त्यादृष्टीने २१व्या शतकातील प्रमुख कौशल्ये, आवश्यक शिक्षण आणि चिकित्सात्मक विचार वाढवण्यासाठी अभ्यासक्रम कमी करणे, अनुभवातून शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येईल. त्यादृष्टीने अभ्यासक्रमांची आखणी करण्याचे काम NCERT द्वारे केले जाईल. शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण ६वी पासून सुरू होईल आणि त्यात इंटर्नशिपचा समावेश असेल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शालेय शिक्षणाच्या पाठ्यपुस्तकांमध्येसुद्धा बदल केले जातील. अशी पाठ्यपुस्तके कमी किमतीत उपलब्ध करून दिली जातील.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काही आवश्यक विषय, कौशल्ये आणि क्षमतेचे अभ्यासक्रमिक एकात्मीकरण करण्यावर या धोरणात लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने या धोरणात खालील भूमिका मान्य केली आहे.
'विद्यार्थ्यांना आपल्या वैयक्तिक अभ्यासक्रमाची निवड करताना त्यात वेगवेगळे पर्याय निवडण्याची मुभा असणे गरजेचे असले तरी, आजकालच्या वेगाने बदलणाऱ्या जगात एक चांगली, यशस्वी, नावीन्यपूर्ण, बदलांशी जुळवून घेणारी आणि निर्माणक्षम व्यक्ती होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी काही विशिष्ट विषय, कौशल्ये आणि क्षमता शिकणे आवश्यक आहे. भाषेवरील प्रभुत्वाखेरीज यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे; वैज्ञानिक वृत्ती आणि पुरावाधिष्ठित विचारसरणी; कल्पकता आणि नावीन्यपूर्णता; सौंदर्यशास्त्र आणि कलेची समज; मौखिक आणि लेखी संवाद साधण्याची कला, स्वास्थ्य आणि पोषण; शारीरिक शिक्षण, तंदुरुस्ती, आरोग्य आणि क्रीडा; सहयोग आणि सांघिक भावना; समस्या सोडवणे आणि तार्किक विचार करणे; व्यावसायिक अनुभव आणि कौशल्ये; डिजिटल ज्ञान, कोडिंग, आणि संगणकीय विचार; नैतिकता आणि नैतिक विचार, मनुष्य आणि घटनात्मक मूल्यांचे ज्ञान आणि अभ्यास, लैंगिक संवेदनशीलता; मूलभूत कर्तव्ये; नागरिकत्वविषयक कौशल्ये आणि मूल्ये; भारताविषयी ज्ञान; पाणी आणि साधनसंपत्तीच्या संरक्षणासह पर्यावरणाविषयी जागरूकता, स्वच्छता आणि साफसफाई; आणि चालू घडामोडी व स्थानिक समुदाय, राज्य, देश आणि जगाला भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांचे ज्ञान.
या भूमिकेचा साकल्याने विचार केल्यास विद्यार्थ्यांना आवश्यक अशी एकविसाव्या शतकाची कौशल्ये आत्मसात करण्यास पूरक शैक्षणिक उपक्रम उपलब्ध होतील हे स्पष्ट दिसून येते.
एकविसाव्या शतकातील आव्हानं पेलण्यासाठी विद्यार्थी सक्षम बनणे गरजेचे आहे. त्याची सुरुवात पुर्व प्राथमिक शाळेतूनच होणे महत्त्वाचे आहे.
जीवन कौशल्ये,मूल्य शिक्षण, किंवा शालेय अभ्यासक्रमातील उद्दिष्ट्ये असोत त्यांची सुरुवात बालवाडी, अंगणवाडी स्तरापासून होते. म्हणून प्राथमिक शाळांमध्ये बालवाडी चे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
✍️ डॉ. अजितकुमार पाटील, कोल्हापूर.