SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागतनिवृत्त हवाई योद्ध्याने मिळविली शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.विद्यार्थ्यांना त्रास देणे थांबवा, अन्यथा सीजेपी करेल मोठे आंदोलन"; अभिजीत दीपके यांचा अल्टीमेटमविना परवाना व्यवसायांवर कोल्हापूर महापालिकेची कारवाई ; एक लॉज सील व तीन आस्थापनांना समजकोल्हापूर : तावडे हॉटेल ते कावळा नाका चौक परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईथकीत घरफाळाधारकांवर सक्तीच्या कारवाईचे आयुक्तांचे आदेशशिरोळ नगरपरिषदेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेत वर्ग करण्याचे आदेशराधानगरी भरले 93 टक्के; कोल्हापूर जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखालीकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 34.5 मिमी पावसाची नोंदकोल्हापुरात २ ऑगस्ट रोजी पहिले ‘अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन’; डॉ. श्रीपाल सबनीस अध्यक्ष, तर शाहिर दिलीप सावंत असणार उद्घाटक!

जाहिरात

 

शहरात प्लास्टिक वापर व अस्वच्छतेविरोधात महापालिकेची धडक कारवाई

schedule28 Jul 26 person by visibility 175 categoryमहानगरपालिका

◼️१० दिवसांत १ लाख 63 हजारांचा दंड

 

कोल्हापूर : शहरातील प्लास्टिक वापर, अस्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या दहा दिवसांत विविध प्रकारच्या नियमभंग करणाऱ्यांकडून १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

यामध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या नागरिक व व्यावसायिकांकडून रु.९२ हजार ५००, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांकडून रु.४७ हजार आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांकडून  रु.२४ हजार असा दंड आकारण्यात आला. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.

महापालिकेने गेल्या दहा दिवसांपासून शहरात जनजागृती मोहीमही हाती घेतली असून, नागरिक व व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आणि शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागाने नागरिक, व्यावसायिक आणि विक्रेत्यांना दैनंदिन कचरा केवळ महापालिकेच्या अधिकृत घंटागाडीतच देण्याचे आवाहन केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर कचरा जाळणे किंवा कचरा रस्त्यावर अथवा नाल्यात टाकल्यास महाराष्ट्र प्लास्टिक व घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील लागू नियम तसेच संबंधित कायद्यांनुसार दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes