SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यतामाजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘एनव्हिजनिंग इंडिया’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनमहावितरणच्या विविध कामांचे पालकमंत्री यांच्या हस्ते १९ एप्रिल रोजी लोकार्पणपशुपालकांसाठी सुवर्णसंधी: 'पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड' अंतर्गत ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य;१० लाख पशुपालकांना लाभ देण्याचे उद्दिष्टशिवाजी विद्यापीठाचा एक्सलॉजिया कंपनीसमवेत सामंजस्य करार‘गोकुळ’ची ५ वर्षे संकल्पपूर्तीची, विश्वास वृद्धिंगत करणारीवारसा जतन : काळाची गरज आणि आपली जबाबदारीमोदी सरकारला मोठा धक्का: लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक फेटाळले!

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाचा एक्सलॉजिया कंपनीसमवेत सामंजस्य करार

schedule18 Apr 26 person by visibility 118 categoryशैक्षणिक

‘ए.आर.’ शैक्षणिक प्रणाली, ‘क्यू. आर.’ बॅंकिंग प्रणालीच्या औद्योगिक उपयोजनासाठी महत्त्वपूर्ण

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा समाजोपयोगी वापर व्हावा, या दृष्टीने तिची सिद्धता होणे हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. त्याचा समाजाबरोबरच विद्यार्थ्यांनाही लाभ मिळवून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट आणि पुणे येथील एक्सलॉजिया टेक एलएलपी यांच्यामध्ये विद्यापीठाने विकसित केलेल्या आभासी वास्तविकता (SUK-AR)  शैक्षणिक प्रणालीतील डिजिटल अ‍ॅसेट्स आणि क्विक रिस्पॉन्स आधारित (QR based) बँकिंग प्रणालीचा वापर आणि वितरण यासाठी काल सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी एक्सलॉजिया कंपनीचे शैलेश कोपर्डेकर म्हणाले, विद्यापीठाने विकसित केलेले नवोपक्रम आणि तंत्रज्ञान प्रत्यक्ष उद्योग-व्यवसाय क्षेत्रापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन या करारासाठी पुढाकार घेतला. या समाजोपयोगी विद्यापीठीय संशोधनाचा समाज आणि उद्योग क्षेत्राला प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी नजीकच्या काळात प्रयत्न करण्यात येतील.

यावेळी सामंजस्य करारावर कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि श्री. कोपार्डेकर यांनी स्वाक्षरी केल्या. स्कूलचे संचालक डॉ. नितीन माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सुधीर देसाई यांनी सामंजस्य कराराविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. वैशाली भोसले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. कविता वड्राळे, डॉ. संतोष सुतार, डॉ. परशुराम वडार, डॉ. तेजश्री मोहरेकर, डॉ. मनस्वी कोपार्डेकर व अभिजित जाधव उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes