SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणाऱ्या महिला चोरट्यास पुण्यातून अटक; पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने जप्तछत्रपती शिवाजी मार्केट, महापालिका व केएमटी वर्कशॉपची आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडून पाहणी ​"शेतकरी कर्ज वसुलीला तत्काळ 'ब्रेक' लावा; पीक कर्ज पुनर्गठनासाठी सतेज पाटलांचा एल्गार"जलसंपदा विभागाच्या प्रस्तावित नवीन नियमांचा शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा; आमदार सतेज पाटील यांचा तीव्र निषेध; ५ जूनपर्यंत हरकती नोंदवण्याचे आवाहन जैवविविधता टिकविण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब आवश्यक : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुधीर कुंभारहितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल : चंद्रकांतदादा पाटीलकोरे अभियांत्रिकी स्थापत्य विभाग व आयएसएसइ यांच्यात सामंजस्य करारमहाराष्ट्राची लोकमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरजागतिक तंबाखू विरोधी दिन: निरोगी भविष्यासाठी एक संकल्पजयसिंगपूर शहरासाठीची सुधारित 70 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे : नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकी स्थापत्य विभाग व आयएसएसइ यांच्यात सामंजस्य करार

schedule31 May 26 person by visibility 194 categoryसामाजिक

वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये दि. १९ मे २०२६ रोजी स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत इंडियन सोसायटी फॉर स्ट्रक्टकरल इंजिनीअर्स (ISSE), कोल्हापूर लोकल सेन्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयएसएस विद्यार्थी शाखेचे उद्घाटन व सामंजस्य करार (MoU) उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी आयएसएसइ कोल्हापूर लोकल सेन्टरचे चेअरमन  प्रशांत हडकर, डायरेक्टर डॉ. रश्मी जाधव तसेच व्हा. चेअरमन  मंदार आंबेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वारणा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास व्ही. कारजिन्नी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. माने, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. धनराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सामंजस्य कराराद्वारे विद्यार्थ्यांना सेमिनार, कार्यशाळा, तज्ज्ञ व्याख्याने तसेच विविध तांत्रिक उपक्रमांच्या माध्यमातून तांत्रिक ज्ञान व व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती, नेतृत्वगुणांचा विकास तसेच संरचनात्मक अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरविषयक मार्गदर्शन मिळणार असून शैक्षणिक व व्यावसायिक सहकार्य वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा. डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील तसेच कुलगुरू मा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुभेच्छा दिल्या.

तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे तसेच प्राध्यापक व विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे आयोजन स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. धनराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रो. पी. बी. फाळके होते. विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes