SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेच्या १४६ कर्मचाऱ्यांची १५ कोटी ५ लाखांची रक्कम राष्ट्रीय निवृत्ती योजनेकडे वर्गविधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर!विधी शिक्षणातील कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी व्हावा : कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्केकोरे डिप्लोमा विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड; ६ लाखांचे वार्षिक पॅकेजजिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईव्यवसाय परवाना न घेतल्याने राजारामपुरीतील मेहता पब्लिशिंग हाऊसचे दुकान सीलबंदठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची महायुतीच्या नेत्यांवर नामुष्की : सतीशचंद्र कांबळे मॉडेल युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतिनिधित्वाची संधीकोंडीग्रे येथील आरोग्य शिबिरात ४२२ नागरिकांची तपासणीपदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

जाहिरात

 

व्यवसाय परवाना न घेतल्याने राजारामपुरीतील मेहता पब्लिशिंग हाऊसचे दुकान सीलबंद

schedule13 Oct 26 person by visibility 255 categoryमहानगरपालिका

◼️नोटीस देऊनही परवाना न घेतल्याने केली कारवाई

 

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवल्याने राजारामपुरी येथील मेहता पब्लिशिंग हाऊस प्रा. लि. यांचे दुकान आज महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागामार्फत सीलबंद करण्यात आले.

राजारामपुरी येथील पाचव्या गल्लीतील जयश्री हाइट्स, शॉप क्रमांक १, सी. एस. क्रमांक १८४७ येथे मेहता पब्लिशिंग हाऊस प्रा. लि. यांचे दुकान आहे. या दुकानात व्यवसाय परवाना न घेता व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने महानगरपालिकेमार्फत संबंधितांना दि.३ ऑगस्ट २०२६ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, नोटीस देऊनही विहित मुदतीत व्यवसाय परवाना प्राप्त करून न घेतल्याने १३ ऑक्टोबर रोजी दुकान सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली.

ही कारवाई महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या निर्देशानुसार व सहायक आयुक्त विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत उपद्रव शोध पथकासह कर अधीक्षक दत्तप्रसाद माजगावकर, कर सहायक अच्युत अडुरकर तसेच मदतनीस सनी सरनाईक व मलिक भोसले यांनी सहभाग घेतला.

महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना घेऊनच व्यवसाय सुरू करावा, तसेच परवान्याबाबतच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes