SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेच्या १४६ कर्मचाऱ्यांची १५ कोटी ५ लाखांची रक्कम राष्ट्रीय निवृत्ती योजनेकडे वर्गविधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर!विधी शिक्षणातील कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी व्हावा : कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्केकोरे डिप्लोमा विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड; ६ लाखांचे वार्षिक पॅकेजजिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईव्यवसाय परवाना न घेतल्याने राजारामपुरीतील मेहता पब्लिशिंग हाऊसचे दुकान सीलबंदठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची महायुतीच्या नेत्यांवर नामुष्की : सतीशचंद्र कांबळे मॉडेल युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतिनिधित्वाची संधीकोंडीग्रे येथील आरोग्य शिबिरात ४२२ नागरिकांची तपासणीपदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

जाहिरात

 

पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

schedule13 Oct 26 person by visibility 202 categoryराजकीय

कोल्हापूर : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे. मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांना मतदानासाठी प्रयत्न करावे आणि बूथस्तरावरील यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे ठाम आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दहा विधानसभा मतदारसंघांच्या प्रमुखांची विस्तृत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

प्रत्येक बूथवर जबाबदारी निश्चित करा, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा आणि नियोजनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, असा स्पष्ट संदेश प्रदेशाध्यक्षांनी या बैठकीत दिला. मतदान केंद्रांची रचना, बूथनिहाय कार्यकर्त्यांची नियुक्ती, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक व्यवस्था यांचा सूक्ष्म आढावा घेण्यात आला. केवळ नियोजन करून थांबू नका, तर प्रत्येक जबाबदारीचा नियमित आढावा घेऊन कामाचा प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांची माहिती देत निवडणूक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित मंडलाध्यक्ष आणि पदवीधर-शिक्षक मतदारसंघ संयोजकांनी मंडळ स्तरावरील संघटनात्मक रचना पूर्ण करून मतदारांशी थेट संपर्क वाढविण्याची ग्वाही दिली. प्रत्येक मतदारापर्यंत किमान दोन ते तीन वेळा पोहोचून त्यांच्याशी संवाद साधणे, मतदार याद्यांचा आढावा घेणे आणि बूथस्तरावरील समन्वय मजबूत करणे यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर बाहेरील जिल्ह्यातील येणारे प्रवासी कार्यकर्ते यांचा देखील समन्वय या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.
आजच्या बैठकीमध्ये कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी, चंदगड, इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी या दहा विधानसभा मधील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.


निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर कार्यकर्त्यांची सक्रियता, अचूक नियोजन आणि जबाबदारीची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात तातडीने कामाला लागून मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवावा आणि सोपविलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, खासदार धनंजय महाडिक, मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, सुरेश हाळवणकर, महापौर रूपाराणी निकम, महेश जाधव, आमदार शिवाजी पाटील,
 प्रकाश आवाडे, कृष्णराज महाडिक, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, पृथ्वीराज बाबा पाटील, योगेश बाचल, तानाजी पाटील, राहुल चिकोडे, विराज चिखलीकर आणि अमर साठे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes