SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
देशाला जगज्जेता बनवण्यासाठी सज्ज व्हा! ४६ व्या वर्धापनदिनी नामदार चंद्रकांतदादा पाटलांची कार्यकर्त्यांना सादअखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग व कॅनॉईंग स्पर्धा २०२५-२६: स्पर्धेवर पंजाबच्या विद्यापीठांचे वर्चस्वआम आदमी पार्टीचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांचा भाजपमध्ये प्रवेशनोव्हेंबरमध्ये मुंबईत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव : मंत्री ॲड.आशिष शेलारकोल्हापूर जिल्ह्यात 18 एप्रिलपर्यंत बंदी आदेश लागूशिवाजी विद्यापीठात १० एप्रिलपासून फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहकोल्हापुरात अतिक्रमणांविरोधात महापौरांचा एल्गार...कोल्हापुरात 'केडीएल प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचा उद्यापासून थरार; ५०० खेळाडूंचा सहभागइचलकरंजीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा; ३४ जणांना अटक, पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्तबारामती पोटनिवडणुकीत मोठी घडामोड; लक्ष्मण हाके यांची माघार

जाहिरात

 

कोल्हापुरात अतिक्रमणांविरोधात महापौरांचा एल्गार...

schedule06 Apr 26 person by visibility 176 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर: "माझं शहर, माझी जबाबदारी" या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर शहराच्या प्रगतीसाठी आणि सौंदर्यीकरणासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आयोजित 'जनता दरबार' मध्ये बोलताना महापौर  रूपाराणी निकम यांनी शहरातील वाढत्या अतिक्रमणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधितांनी अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करून येत्या १५ दिवसानंतर शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिका मोहीम राबवेल असा इशारा दिला आहे.

 रंकाळा परिसरात महापालिकेने धडक कारवाई करत तब्बल १७ खाऊ गाड्यांवर कारवाई केली. या पार्श्वभूमीवर महापौरांनी स्पष्ट केले की, यापुढे कोल्हापूर शहरात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. विशेष म्हणजे, प्रशासकीय कारवाईत कोणत्याही लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

"अतिक्रमण हा शहराच्या प्रगतीमधील मोठा अडथळा आहे. ज्या व्यावसायिकांच्या गाड्या किंवा दुकाने अतिक्रमणामध्ये आहेत, त्यांनी १५ दिवसांच्या आत ती स्वतःहून काढून घ्यावीत. अन्यथा, त्यानंतर महानगरपालिकेकडून अत्यंत कडक मोहीम राबवून अतिक्रमणे हटविण्यात  येतील ," असा थेट इशारा महापौर निकम यांनी दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes