SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे वॉलचंद कॉलेज येथील स्ट्रक्चर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिससीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी...'महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम' (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागरबळीराजा पाणंद रस्त्यांसाठी ३० दिवसांत पाहणी व प्रस्ताव सादर करा; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे निर्देशजनता दरबारामधील तक्रारीच्या अनुषंगाने महापौर रुपाराणी निकम यांची सुर्वे नगर परिसरात पाहणीकोल्हापुरात स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; १२ मोटार सायकलींसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्तजैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाभिमुख दृष्टीकोन आवश्यक : डॉ. एस. आर. यादव आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारातून क्षारपडमुक्ती प्रकल्पाला वेग जिल्हा परिषद समाजकल्याण सभापतीपदी श्रद्धाताई गायकवाड स्वीकारला पदभार

जाहिरात

 

जनता दरबारामधील तक्रारीच्या अनुषंगाने महापौर रुपाराणी निकम यांची सुर्वे नगर परिसरात पाहणी

schedule07 Apr 26 person by visibility 128 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : सोमवारी झालेल्या जनता दरबारमधील अर्जाच्या अनुषंगाने महापौर  रुपाराणी निकम यांनी आज सकाळी प्रभाग क्र. 20 मधील सुर्वेनगर, विद्या-वसंत पार्क (रि.स. नं. 853, प्लॉट नं. डी-5) येथे प्रत्यक्ष पाहणी केली. युवराज पांडुरंग पाटील यांनी त्यांच्या घराच्या परिसरात अनाधिकृतरीत्या सोडण्यात येणाऱ्या गटारी व शौचालयाच्या सांडपाण्याबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीची दखल घेत महापौरांनी संबंधित जागेवर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. 

यावेळी स्थानिक नगरसेवक अभिजित खतकर, वैभव कुंभार, नगरसेविका सौ. नेहा तेंडुलकर तसेच जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी व कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले उपस्थित होते.

पाहणीदरम्यान महापौरांनी परिसरातील ड्रेनेज लाईन, रस्ते, गटर्स व पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच अमृत योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या व ड्रेनेज लाईनची कामे नवीन रस्ता करण्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी जल अभियंत्यांना दिल्या.

🔳 अवयवदान उपक्रमात सहभाग

दरम्यान, या पाहणीवेळी परिसरातील स्वामी समर्थ केंद्राअंतर्गत आयोजित अवयवदान उपक्रमालाही महापौरांनी भेट दिली. ओमकार नवनिहाळकर यांच्या पुढाकाराने आयोजित या कॅम्पमध्ये महापौर  रुपाराणी निकम यांनी स्वतः नाव नोंदवून अवयवदानाचा फॉर्म भरला व आपले अवयव दान करण्याचा संकल्प लेखी स्वरूपात व्यक्त केला.

या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes