SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारलेराज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५,०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावर शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषदजिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधी मिळणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकरगंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी जिल्ह्यात पेलिएटिव्ह केअर सेवेचा प्रारंभमंदिर प्रीमियम लीग येत्या १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यानअपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राह-वीर योजनापश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे, भव्य भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्या शुक्रवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा विजेतासंजय घोडावत विद्यापीठाचा क्यू-स्पायडर्स, बंगळुरूसोबत शैक्षणिक व प्लेसमेंट करार

जाहिरात

 

मंदिर प्रीमियम लीग येत्या १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान

schedule12 Feb 26 person by visibility 117 categoryक्रीडा

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतीक परंपरेमध्ये मंदिरांचे पुजाऱ्यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. हेच पुजारी बांधव एकत्र येऊन, त्यांच्यातील संघटन व क्रिडा नैपुण्य वाढविण्यासाठी कोल्हापूरातील शास्त्रीनगर मैदान येथे येत्या १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'मंदिर प्रीमियर लीग' पर्व २ रे या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 राज्यातील विविध देवस्थानांमधील पुजारी तसेच कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने स्पर्धेला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. अशी माहिती स्पर्धा समितीचे अध्यक्ष मकरंद मुनीश्वर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

ते पुढे म्हणाले, ' स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिके देण्यात येणार आहेत. यामध्ये विजेता पारितोषिक, उपविजेता पारितोषिक, तृतीय क्रमांक पारितोषिक, विजेता/उपविजेता/तृतीय क्रमांक चषक,स्पर्धेतील इतर चषक इत्यादी.
प्रथम क्रमांक २५५५५/-
द्वितीय क्रमांक २११११/-
तृतीय क्रमांक १५५५५/-

स्पर्धेमध्ये सहभागी होणारे संघ:
१) श्री क्षेत्र जोतिबा
२) श्री क्षेत्र नृसिंहवाडी
३) श्री क्षेत्र अंबाबाई / महालक्ष्मी देवस्थान- अ 
४) ओढ्यावरचा गणपती (प.म.दे.स.)
५) परशुराम सोशल फौंडेशन
६) श्री क्षेत्र तुळजापूर- अ 
७) श्री क्षेत्र तुळजापूर - ब
८) श्री क्षेत्र पंढरपूर
९) श्री क्षेत्र माहुरगड
१०) श्री क्षेत्र शिर्डी
११) श्री क्षेत्र अंबाबाई / महालक्ष्मी देवस्थान - ब 
१२) श्री महालक्ष्मी (सारसबाग, पुणे)
असे एकूण बारा संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धा डे नाईट खेळवल्या जाणार असून या स्पर्धेचे उद्घाटन १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापौर  रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष लाभेश मुनीश्वर, सचिव मयूर मुनीश्वर, कार्याध्यक्ष विनायक चव्हाण कार्याध्यक्ष विनायक चव्हाण, सदस्य चैतन्य अष्टेकर, रोहन दातार अमित दिवाण, शरद मुनीश्वर यांच्यासह सर्व समिती सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes