SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारलेराज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५,०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावर शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषदजिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधी मिळणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकरगंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी जिल्ह्यात पेलिएटिव्ह केअर सेवेचा प्रारंभमंदिर प्रीमियम लीग येत्या १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यानअपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राह-वीर योजनापश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे, भव्य भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्या शुक्रवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा विजेतासंजय घोडावत विद्यापीठाचा क्यू-स्पायडर्स, बंगळुरूसोबत शैक्षणिक व प्लेसमेंट करार

जाहिरात

 

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५,०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

schedule12 Feb 26 person by visibility 120 categoryराज्य

मुंबई  : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील 5 हजार 12  रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले,  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निर्देशानुसार प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे अनिवार्य होते. याच पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

▪️भरती प्रक्रियेच्या प्रमुख अटी व शर्ती:-
विद्यार्थी संख्येवर आधारित पदे १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार निश्चित झालेल्या कार्यभाराच्या आधारे ही ५,०१२ पदे भरली जातील. ही भरती प्रक्रिया विहित कालमर्यादेत आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवण्याची जबाबदारी उच्च शिक्षण संचालक (पुणे) आणि विभागीय सहसंचालकांची असेणार आहे.

▪️NAAC मानांकन अनिवार्य
ज्या शैक्षणिक संस्थांकडे 'नॅक' (NAAC) मान्यता आहे, त्यांनाच नवीन पदनिर्मितीचा लाभ मिळेल. मात्र, ज्यांचे मूल्यांकन कमी आहे, त्यांना सुधारणेसाठी तीन वर्षांचा सवलतीचा कालावधी देण्याबाबत शासन स्वतंत्र धोरण आखणार आहे.t

▪️आचारसंहितेचे पालन-
 भरती प्रक्रियेदरम्यान राज्यात आचारसंहिता लागू असल्यास, निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सूचनांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संचालक,उच्च शिक्षण पुणे व संबंधित विभागीय सहसंचालक यांची राहील.

● नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदांचा सुधारित आराखडा (आकृतीबंध) निश्चित करण्यासाठी उच्च शिक्षण संचालकांच्या स्तरावर एक समिती नियुक्त केली जाणार आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes