SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारलेराज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५,०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावर शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषदजिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधी मिळणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकरगंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी जिल्ह्यात पेलिएटिव्ह केअर सेवेचा प्रारंभमंदिर प्रीमियम लीग येत्या १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यानअपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राह-वीर योजनापश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे, भव्य भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्या शुक्रवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा विजेतासंजय घोडावत विद्यापीठाचा क्यू-स्पायडर्स, बंगळुरूसोबत शैक्षणिक व प्लेसमेंट करार

जाहिरात

 

संजय घोडावत विद्यापीठाचा क्यू-स्पायडर्स, बंगळुरूसोबत शैक्षणिक व प्लेसमेंट करार

schedule12 Feb 26 person by visibility 120 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बंगळुरू येथील नामांकित क्यू-स्पायडर्स  संस्थेसोबत शैक्षणिक व प्लेसमेंट भागीदारीचा सामंजस्य करार केला. क्यू-स्पायडर्ससोबत अशा प्रकारचा विशेष शैक्षणिक भागीदार करार करणारे संजय घोडावत विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ ठरले आहे.

क्यू-स्पायडर्स ही २००३ साली स्थापन झालेली जागतिक स्तरावरील सॉफ्टवेअर व मॅनेजमेंट प्रशिक्षण संस्था असून तिचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग, डेव्हलपमेंट आणि आयटी करिअर प्लेसमेंट क्षेत्रात विशेष प्रावीण्य असलेल्या या संस्थेने आतापर्यंत १५० हून अधिक केंद्रांद्वारे दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. उद्योग व शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करण्यासाठी ही संस्था ‘फिनिशिंग स्कूल’ म्हणून कार्यरत आहे.

क्यू-स्पायडर्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरीश शिवन्ना यांनी विद्यापीठाला भेट देऊन बी.टेक., एमबीए (फिनटेक व डेटा अ‍ॅनालिटिक्स), एमसीए (फुलस्टॅक स्पेशलायझेशन) आणि बी.डिझाईन (यूआय/यूएक्स) या  अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक भागीदारीचा करार केला. यावेळी बोलताना गिरीश शिवन्ना म्हणाले,

"या सहकार्यामुळे घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शैक्षणिक तज्ज्ञ व उद्योग क्षेत्रातील तज्ञांकडून प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. क्यू-स्पायडर्सच्या सक्षम प्लेसमेंट सेलद्वारे घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रात्यक्षिक व उद्योगाभिमुख असून पदवी पूर्ण होताच विद्यार्थी रोजगारासाठी सक्षम बनतील."
विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनिअर, ऑटोमेशन इंजिनिअर, मॅन्युअल टेस्टर, फुलस्टॅक डेव्हलपर, डेटा अ‍ॅनालिस्ट इत्यादी मागणी असलेल्या उद्योग क्षेत्रांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच उद्योगाशी निगडित प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी व कौशल्याधारित विकासाला चालना मिळणार आहे.

विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. संजय घोडावत हे उद्योगसज्ज अभियंते व व्यवस्थापन क्षेत्रातील व्यावसायिक घडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांनी या उपक्रमाबाबत व करारबाबत सकारात्मक भूमिका घेतली. विश्वस्त व गव्हर्निंग बॉडी सदस्य श्री. विनायक भोसले यांनी या सहकार्याच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली. कुलगुरू प्रा. डॉ उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार यशस्वी झाला असून विद्यापीठाच्या वतीने रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या शैक्षणिक सहकार्याचे विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनतील, असा विश्वास चेअरमन संजय घोडावत यांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes