SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीत‘फ्युचर रेडी इंजिनिअर्स प्रोग्राम २०२६–२७’चे उद्घाटनवारणा उद्योग समूहाकडून शेतकरी, कामगारांची दिवाळी गोड; दिवाळी सणानिमित्त सुमारे १२५ कोटी रुपयांचे वितरणकोल्हापूर महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची विशेष मोहीमविनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी शहरातील 11 आस्थापने सीलकोल्हापूर : अनधिकृत फटाका विक्री केल्यास २ हजार रुपये दंड; फटाका स्टॉलसाठी निश्चित केलेल्या जागेवरच विक्रीस परवानगीगांधीनगर बाजारपेठेत दिवाळीत भारनियमन नको; करवीर शिवसेनेचा महावितरणला इशारा‘केआयटी’त सायबर सुरक्षा विषयात विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे‘गोकुळ’ची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विक्रमी २१ लाख ७० हजार लिटर दूध विक्री!शिरढोण येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीजागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन: महत्त्व आणि जतनाची गरज

जाहिरात

 

गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेत महायुती तांत्रिक मुद्दा आणणार नाही : आमदार सतेज पाटील

schedule25 Oct 26 person by visibility 314 categoryराजकीय

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोरमचा तांत्रिक मुद्दा पुढे आला आहे. मात्र, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, विनय कोरे, संजय मंडलिक यांनी सहकारात काम केले आहे. त्यामुळे तांत्रिक मुद्द्यावर ते अशी कोणतीही परिस्थिती तयार करणार नाहीत. त्यांचे सगळे १२ संचालक निश्चिपणे त्या सभेला येतील, असा विश्वास काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. 

आमदार पाटील म्हणाले, गोकुळ निवडणुकीत कोरमचा विषय आहे. पण बहुमताचा निकाल आमच्या बाजूने आहे. विरोधकांनी आम्हाला मिळालेल्या बहुमताचे स्वागत केले आहे. चुकीचा पायंडा राज्याच्या सहकारात पडणार नाही याची खात्री आहे. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ,  पालक्षमंत्री प्रकाश आबिटकर, विनय कोरे, संजय मंडलिक चुयेकरांच्या मुलाला चेअरमन करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतील अशी खात्री आहे असे सांगत आमदार पाटील यांनी गोकुळचा चेअरमन आमचाच होणार यात दुमत नाही असा दावाही केला. 

◼️ लढलो की जिंकू शकतो हा संदेश गोकुळच्या माध्यमातून राज्यभर गेला आहे. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष राज्यात सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes