SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अवसायनातील दूध संस्थांच्या न्यायासाठी ‘गोकुळ’ची ठाम भूमिका : चेअरमन नविद मुश्रीफशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'शिवशाही पुनर्वसन' प्रकल्पाला बळकटी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमिशन लक्षवेध अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकासघरगुती-व्यावसायिक गॅस पुरवठा सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कंपन्यांना निर्देशट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील जीएसटी रद्द करावा, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणीपायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी यशस्वीरीत्या संपन्नकोल्हापूर : घरफाळा सवलत योजना 80 टक्के सवलतीचा शेवटचा दिवसमहाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अर्थसहाय्य योजनापी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर राबविणार : मंत्री हसन मुश्रीफ 'सेवर्ड्स फॉली': एका 'मूर्खपणाच्या' कराराने अमेरिकेला कसं बनवलं महासत्ता?

जाहिरात

 

कोल्हापूर : घरफाळा सवलत योजना 80 टक्के सवलतीचा शेवटचा दिवस

schedule30 Mar 26 person by visibility 102 categoryमहानगरपालिका

◼️घरफाळा दंड सवलत योजनेच्या पाचव्या दिवशी 1.83 कोटींची वसुली

कोल्हापूर : महानगरपालिका करआकारणी व वसुली (घरफाळा) विभागाने शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एक रक्कमी भरणा केल्यास दंडव्याजामध्ये 80 टक्के सवलत योजना जाहीर केली आहे.

या सवलत योजनेत आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1,592 मिळकत धारकांनी रु. 1 कोटी 83 लाख 73 हजार 829 रक्कम जमा केलेली आहे. तसेच दि.26 ते 30 मार्च 2026 अखेर 80 टक्के सवलत  योजनेत शहरातील 4,625 थकबाकीदारांनी लाभ घेतला असून या सवलत योजनेमुळे महानगरपालिकेचा थकीत रक्कम रु.6 कोटी 3 लाख 29 हजार 936 इतका घरफाळा वसूल झाला आहे. नागरिकांना या सवलत योजनेमधून रक्कम रु. 2 कोटी 49 लाख 90 हजार 707 इतकी सवलत मिळाली आहे.  

त्याचप्रमाणे उद्या मंगळवार, दि.31 मार्च 2026 रोजी 80 टक्के सवलत योजनेचा शेवटचा दिवस असलेने महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र सकाळी 9:00 ते सायंकाळी 9:00 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. 

तरी शहरातील जास्तीत जास्त थकबाकी असलेल्या मिळकतधारकांनी 80 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes