SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अवसायनातील दूध संस्थांच्या न्यायासाठी ‘गोकुळ’ची ठाम भूमिका : चेअरमन नविद मुश्रीफशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'शिवशाही पुनर्वसन' प्रकल्पाला बळकटी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमिशन लक्षवेध अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकासघरगुती-व्यावसायिक गॅस पुरवठा सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कंपन्यांना निर्देशट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील जीएसटी रद्द करावा, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणीपायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी यशस्वीरीत्या संपन्नकोल्हापूर : घरफाळा सवलत योजना 80 टक्के सवलतीचा शेवटचा दिवसमहाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अर्थसहाय्य योजनापी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर राबविणार : मंत्री हसन मुश्रीफ 'सेवर्ड्स फॉली': एका 'मूर्खपणाच्या' कराराने अमेरिकेला कसं बनवलं महासत्ता?

जाहिरात

 

अवसायनातील दूध संस्थांच्या न्यायासाठी ‘गोकुळ’ची ठाम भूमिका : चेअरमन नविद मुश्रीफ

schedule30 Mar 26 person by visibility 143 category

▪️कोल्हापूर जिल्हा दूध संस्था बचाव समितीचा मेळावा संपन्न

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्थांना न्याय मिळावा, अवसायन नोटीसचा पुनर्विचार करावा तसेच पात्र संस्थांचा मतदान हक्क अबाधित ठेवावा, अशी ठाम भूमिका गोकुळची असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

 कोल्हापूर जिल्हा दूध संस्था बचाव समितीच्या वतीने ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉलमध्ये आयोजित प्राथमिक दूध संस्थाना न्याय हक्क मिळवण्यासाठी तसेच अवसायनात नोटीस विरोधात व मतदान हक्क संरक्षण मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यास ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्यासह संचालक मंडळ तसेच प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने दूध उत्पादक उपस्थित होते.

 यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघाशी संलग्न ११०८ दूध संस्थांचा अवसायन यादीत समावेश झाल्यामुळे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक सभासदांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दूध उत्पादक हे गोकुळचे हृदय असून प्राथमिक दूध संस्था या त्या हृदयाच्या धमन्या आहेत. शेतकऱ्यांच्या कष्ट, विश्वास आणि एकजुटीमुळेच गोकुळने २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठला असून ही प्रगती प्रत्येक संस्थेच्या योगदानातून उभी राहिली आहे, असे त्यांनी सांगितले. अवसायन यादीत समाविष्ट झालेल्या बहुतांश संस्था कार्यरत असून नियमित दूध पुरवठा करीत आहेत. त्यांच्या लेखापरीक्षण प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत तसेच नियमानुसार निवडणुका देखील पार पडलेल्या आहेत. या संस्थांकडून दररोज सुमारे १ ते १.५ लाख लिटर दूध संकलन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दूध उत्पादन हे वैरण, पाणी व हवामान यांसारख्या नैसर्गिक घटकांवर अवलंबून असल्याने संकलनातील चढ-उतार ही सामान्य बाब आहे. त्यामुळे अशा तात्पुरत्या कारणांवरून संस्थांवर कठोर कारवाई करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

 शासन व दुग्ध विभागाने अवसायन यादीतील सर्व ११०८ संस्थांना न्याय देऊन पात्र संस्थांचा गोकुळच्या मतदार यादीत समावेश करावा आणि निवडणूक प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी मागणी त्यांनी केली. ही मागणी पूर्णपणे कायदेशीर चौकटीत करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोणतीही दूध संस्था एकटी नाही, गोकुळचे संचालक मंडळ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित संस्था प्रतिनिधींनीही आपली भूमिका मांडताना अवसायन यादीतील बहुतांश संस्था कार्यरत असतानाही त्यांचा समावेश का करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला. गोकुळ ही आमची मातृसंस्था असून तिच्या प्रगतीत आमचे मोठे योगदान आहे. गावागावातील लहान संस्थांमधून सातत्याने दूध पुरवठा होत असताना हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दुग्ध विभागाने याचा गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच आपल्या संस्थेच्या व्यथा मांडल्या व आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी सर्वानो मते करण्यात आली. तसेच संस्थेना बोगस म्हणाऱ्या प्रवृतीचा जाहीर निषेद करण्यात आला. या मेळाव्यास महिला दूध संस्था प्रतिनिधींची संख्या मोठी होती व प्रत्येक तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींनी मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) कोल्हापूर यांना मोचक्याच दूध संस्था प्रतिनिधींनी निवेदन देण्याचे ठरले.

 यावेळी संस्था प्रतिनिधी अनंतराव कुलकर्णी दूध संस्था अ.लाटचे विद्याधर कुलकर्णी, स्वामी समर्थ दूध संस्था बामणीचे युवराज पाटील, विठ्ठलाई देवी दूध संस्था कौलवचे केरबा पाटील, संभाजी खोत भुयेवाडी, विश्वासराव इंगवले हातकणंगले, दादू पाटील मरळी, आनंदा पाटील तळये खुर्द, शिवाजी शिंदे भुदरगड, विजय सरननोबत पन्हाळा, महादेव मोरे आजरा, गुरुनाथ शिंदे शाहुवाडी, राहुल शीरमोळे गडहिंग्लज, दिपक पाटील निवडे गगनबावडा,गणेश शिंदे शिरोळ, महालक्ष्मी महिला दूध संस्था बहिरेश्वर  संजीवनी बचाटे यांनी मनोगत व्यक्त केले.

या मेळाव्यास गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, तसेच के,डी.सी.सी.बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, सतिश पाटील, नाथाजी पाटील, सचिन घोरपडे, विकास पाटील, व दूध संस्था प्रतिनिधी व महिला दूध संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes