भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा ! कृष्णराज महाडिक यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी
schedule24 Feb 26 person by visibility 119 categoryराजकीय
मुंबई - भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. या प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
कृष्णराज महाडिक यांच्यावर पक्षाने पश्चिम महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्षपदाची नवी जबाबदारी दिली आहे. केशव उपाध्ये यांनाही कार्यकारिणीत बढती दिली असून यापुढे भाजपाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी नवनाथ बन यांच्यावर सोपवली आहे

