SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर एलसीबीचा थरारक 'ट्रॅप'; रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त!अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती गठित करणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलराज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम प्राधान्याने सुरू : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरविद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख पाच ते सहा योजनांची माहिती देणारे फलक शाळांमध्ये लावले जावे : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई येथे आगमनसंजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजनभाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा ! कृष्णराज महाडिक यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारीसंजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मानजिल्हा परिषद निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीची गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण केंद्रीय उत्पादन शुल्क दिन: देशाच्या आर्थिक प्रगतीचा कणा

जाहिरात

 

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती गठित करणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

schedule24 Feb 26 person by visibility 115 categoryशैक्षणिक

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय  समिती गठीत केली  जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य मनीषा कायंदे यांनी अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव मधील गैरव्यवहार प्रकरणी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही सहभाग घेतला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, ही संस्था विना अनुदानित असल्याने या संस्थेवर प्रशासक नेमता येत नाही.

मात्र या संस्थेविरुद्ध संस्थेतील माजी विद्यार्थ्याकडून शुल्काबाबतच्या प्राप्त तक्रारी तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष, संघटना, संस्थेचे माजी कर्मचारी यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी गठित समितीमार्फत सखोल चौकशी करून तीन महिन्यात अहवाल सादर केला जाईल.

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न असल्याने याबाबत संस्थेच्या विरोधात कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी मुंबई विद्यापीठानेही त्रिस्तरीय समिती नियुक्ती केली आहे. या समितीचे कामकाज सुरू असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes