SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर एलसीबीचा थरारक 'ट्रॅप'; रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त!अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती गठित करणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलराज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम प्राधान्याने सुरू : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरविद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख पाच ते सहा योजनांची माहिती देणारे फलक शाळांमध्ये लावले जावे : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई येथे आगमनसंजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजनभाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा ! कृष्णराज महाडिक यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारीसंजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मानजिल्हा परिषद निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीची गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण केंद्रीय उत्पादन शुल्क दिन: देशाच्या आर्थिक प्रगतीचा कणा

जाहिरात

 

विद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख पाच ते सहा योजनांची माहिती देणारे फलक शाळांमध्ये लावले जावे : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

schedule24 Feb 26 person by visibility 113 categoryराज्य

मुंबई :  विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख पाच ते सहा योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजनांबाबत आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मंत्री दादाजी भुसे बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, शिक्षण संचालक (एनसीईआरटी) हेमंत वसेकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर, शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी, उपसचिव तुषार महाजन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

मंत्री दादाजी भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना व पालकांना नसते. या योजनांपासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून प्रयत्न केले जावे. प्रमुख योजनांची माहिती ठळक स्वरूपात तीन बाय चार आकाराच्या फलकाद्वारे प्रत्येक शाळेमध्ये दर्शनी जागी लावली जावी. 

  मंत्री दादाजी भुसे म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून अनाथ विद्यार्थ्यांसह, तसेच ज्याचे दोन्ही पालक अपंग आहेत असे विद्यार्थी, पॉक्सो कायदा अंतर्गत नुसार पिडित विद्यार्थी आदींना शिक्षणासाठी दरमहा 2,250 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने यासाठी नियुक्त संस्थांनी अशा बालकांचा शोध घेऊन त्यांची परिपूर्ण माहिती द्यावी. जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती कडून यासाठी कार्यवाही केली जाते. एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना कालावधी सुरू केलेली योजना आता नियमित स्वरूपात सुरू आहे, असे मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.

  राज्यातील सर्व अनुदान व विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी आणि प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. एकूण 21534199 विद्यार्थ्यांपैकी 1045125 विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी असून त्या साठी कार्यवाही केली जावी अशा सूचना मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित विविध बाबींची माहितीच सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes