कोल्हापूर : 60 फुटी बुमद्वारे एक हजार टन गाळ एका दिवसात उठाव
schedule29 May 25 person by visibility 254 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरामध्ये पावसाने उसंती दिल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने युध्दपातळीवर गाळ, खरमाती व प्लॅस्टीक कचरा काढण्यात येत आहे. यामध्ये आजपासून ॲस्टर आधार येथे 60 फुटी बुम असलेल्या पोकलँन्ड मशिनद्वारे गाळ काढण्यात येत आहे. या मशिनद्वारे आज एका दिवसात एक हजार टन गाळ उठाव नाल्यातून काढण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पोकलॅन्ड मशिन जाऊ शकत नाही त्या ठिकाणी या 60 फुटी बुम असलेल्या पोकलँन्ड मशिनद्वारे काम करण्यात येत आहे.
त्याचबरोबर शाम सोसायटी, बुद्ध गार्डन, जरगनगर येथेही पोकलॅन्ड मशिनच्या सहाय्याने गाळ उठाव करण्यात येत आहे. या तीन पोकलॅन्ड मशिनद्वारे आज 400 टन गाळ उठाव करण्यात आला आहे. आज अखेर शहरामधून ओढे व नाल्यातून 19040 हजार टन गाळा काढण्यात आला असून 9700 टन गाळ उठाव करण्यात आला आहे. उर्वरीत गाळ ओला असल्याने तो सुकल तसा उठाव करण्यात येत आहे.सदरची कामे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येत आहे.
त्याचबरोबर गांधी मैदान येथील सांडपाणी ब-याच प्रमाणात निचरा झाले असून या ठिकाणी प्लॅस्टीक बॉटल व इतर कचरा जो बायपास केलेल्या चॅनलमध्ये आडकला होता तोही आज आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचा-यांमार्फत काढण्यात आला आहे.