कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
schedule31 May 25 person by visibility 359 categoryराज्य

कोल्हापूर : कळंबे तर्फ ठाणे तालुका करवीर येथे ग्रामपंचायतीच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच सुमन विश्वासराव गुरव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आशा सेविका ज्योती खडके यांचा सरपंच सुमन गुरव व अंगणवाडी सेविका छाया साठे यांचा उपसरपंच पूनम जाधव यांच्या हस्ते मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी सरपंच विश्वासराव गुरव , गटनेते उदय जाधव, रोहित मिरजे, संदीप पाटील, रोहित जगताप, विकास पोवार, दीपक तिवले, दिलीप टिपुगडे, आदी सदस्य, तसेच ग्रामपंचायत अधिकारी व्हि. डी. राबाडे, पाणीपुरवठा सह. कर्मचारी पत संस्थेचे चेअरमन उत्तम जाधव, प्रकाश खडके, लक्ष्मण मिरजे, अमोल पाटील, विशाल तिवले, महादेव तिवले, निवृत्ती चौगुले आदि मान्यवर उपस्थित होते.