SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जैन समाजाच्या विकासाचा नवीन अध्याय सुरु : मंगलप्रभात लोढा; जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटननूतन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे भाजपा जिल्हा कार्यालयात जल्लोषी स्वागतशेती केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार : उपमुख्यमंत्री अजित पवारजग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाशिक येथे कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकसकाळ आणि घोडावत विद्यापीठांतर्गत 'समर युथ समिट' ३, ४ जून रोजी कोल्हापुरात‘गोकुळ’ मार्फत सी.पी.आर.रुग्णालयात रुग्णांना व नातेवाईकांना मोफत दूध वाटप...शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पन्न वाढवा, सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्या, कृषी विज्ञान केंद्रांशी सतत संपर्क ठेवा; खा. धनंजय महाडिक यांनी शेतकऱ्यांशी साधला संवादकिमान 10 जूनपर्यंत पावसात घट; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नयेपहलगाम दहशतवादी हल्ला : राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीतघरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

जाहिरात

 

जागतिक स्तरावरील कॅन्सर उपचार आता कोल्हापुरात; कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेशी सामंजस्य करार

schedule30 May 25 person by visibility 337 categoryआरोग्य

कोल्हापूर :  कॅन्सर रुग्णांच्या जीवनात प्रकाशाचा किरण आणणाऱ्या कोल्हापूर कॅन्सरचे नाव आता जागतिक स्तरावर पोहचले आहे. कोल्हापूर कॅन्सर सेंटर आता कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेशी संलग्न झाले आहे. याबाबतचा सामंजस्य करार आज हॉस्पिटलमध्ये झाला. सामंजस्य करारावर कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सूरज पवार व कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर राजेश मंथेना यांनी स्वाक्षरी करून कराराचे अदान-प्रदान केले.

मागील २० वर्षांपासून कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे काम, अडव्हॉन्सड टेकनॉलॉजी, कामाचा दर्जा, पेशंटचे रिझल्ट्सबरोबर कोल्हापूर कॅन्सर सेंटर ज्याप्रमाणे आरोग्य क्षेत्रात काम करीत आहे ते सर्व पाहून कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका ही संस्था कोल्हापूर कॅन्सर सेंटरशी संलग्न (जॉईंट व्हेंचर) झालेली आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा येथील ५० हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे झाले आहेत.

कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेशी संलग्न झाल्यामुळे सर्व सामान्य रुग्णांना जागतिक दर्जाचे कॅन्सर उपचारांचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर कॅन्सर क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा लाभ रुग्णसेवेकरिता करता येणार आहे. या सामंजस्य करारामुळे देशभरातील रुग्णांबरोबर परदेशातील रुग्णांना देखील सेवा घेता येईल. करार दरम्यान, अमेरिकेतून कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकाचे चेअरमन ऑफ बोर्ड डॉ. शालीन शहा यांनीही लाईव्ह व्हिडिओ कॉल द्वारे कार्यक्रमात सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. 

यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. रेश्मा पवार, स्मिता राजू, डॉ. योगेश अनाप, डॉ. पराग वाटवे, दयाकर पी, साई संदीप कटेपल्ली यांच्यासह कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे सर्व डॉक्टर, कर्मचारी आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes