SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
10 वी पुरवणी परीक्षा जून-जुलैसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरूपश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपाययोजना जाहीरविधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित १० सदस्यांना दिली शपथअद्वितीय पराक्रमाचा जळजळता इतिहास: छत्रपती संभाजी महाराजपंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 6 लाख 49 हजार जमाएमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्दमुश्रीफांचे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना आवाहन: कर्जमाफीची वाट न पाहता मुदतीत कर्ज फेडा!छत्रपती शंभूराजेंच्या भव्य शिल्पामुळे शिरोळच्या इतिहासाला मिळाला उजाळा : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरखुपीरे ग्रामीण रुग्णालयात १५ ऑगस्टपूर्वी डायलेसिस सेवा सुरू करा : मंत्री प्रकाश आबिटकरमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर; उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

जाहिरात

 

शहर वाहतूक नियोजनासाठी महापालिका-शहर वाहतूक शाखेची संयुक्त बैठक संपन्न

schedule13 May 26 person by visibility 208 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली शहर वाहतूक नियोजनाबाबत आज दुपारी महापालिका व शहर पोलिस वाहतूक विभागाची संयुक्त बैठक आयुक्त कार्यालयात पार पडली. शहरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण, पार्किंग व्यवस्था आणि सिग्नल यंत्रणा सुधारण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

      या बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी शहर वाहतूक शाखा व महापालिकेने संयुक्तपणे रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः अंबाबाई मंदिर परिसर, मुख्य रस्ते तसेच फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यावर भर देण्यात आला. पर्यटकांच्या दृष्टीने मंदिर परिसर व रंकाळा तलाव परिसर स्वच्छ व मोकळा ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी सातत्याने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. वाहतूक शाखेने दररोज कारवाईचे ठिकाण निश्चित करावे आणि त्या ठिकाणी महापालिका कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येतील असेही स्पष्ट करण्यात आले. शहरातील खराब झालेले सिग्नल बदलण्यासाठी आवश्यक तांत्रिक तपशील वाहतूक शाखेने सादर करावेत तसेच निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र द्यावे अशा सूचनाही देण्यात आल्या. खाजगी पार्किंग सुरू करण्यासाठी इच्छुकांकडून मागण्यात आल्यास धोरण ठरवून परवाना शुल्क व अटी-शर्तींसह परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरस्वती टॉकीज येथील गाळेधारकांना दोन दिवसांत आतमध्ये स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच गाडी अड्डा येथे पार्किंच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तात्काळ एस्टीमेट सादर करावे. या ठिकाणी पार्किंग सुविधा सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवावी गाडी अड्डा येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात यावी त्यानंतर सदर ठिकाणावरील सर्व साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्यात करावी अशा सूचना सहा.आयुक्तांना दिल्या. शहरातील बेवारस वाहनांवरही महापालिका व वाहतूक शाखा संयुक्त कारवाई करून ती वाहने जप्त करावीत. महावितरणमार्फत रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या ट्रान्सफॉर्मरबाबतही आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे महापालिकेची ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय नवीन ट्रान्सफॉर्मर उभारू नयेत, याबाबत लेखी महावितरणला कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

   या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त जयंत जावडेकर, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरिक्षक नंदकुमार मोरे, उपशहर अभियंता अरुण गुजर, निवास पोवार, इस्टेट ऑफिसर शितलकुमार साळोखे, विद्युत अभियंता नारायण पुजारी, शाखा अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता प्रिया पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes